नवी दिल्ली : हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या पवनहंस कंपनीची १०० टक्के भाग विक्री करण्यासाठी सरकार लवकरच निविदा मागविणार आहे. या कंपनीत सरकारचे ५१ टक्के तर, ओएनजीसीचे ४९ टक्के भाग आहेत. सरकारने १३ एप्रिल रोजी ५१ टक्के भाग विक्रीसाठी जाहीरात दिली होती. तथापि, सरकारसोबत आम्हीही कंपनीतून बाहेर पडण्यास तयार असल्याचे ओएनजीसीने २ जुलैला कळविले. त्यामुळे आता पवनहंस कंपनीच्या १०० टक्के भाग विक्रीसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.सरकारने मागील वर्षीच पवनहंसमधील आपला हिस्सा विक्रीचा प्रयत्न केला होता. मात्र, ओएनजीसीच्या माध्यमातून यात सरकारचा हस्तक्षेप कायम राहील. त्यामुळे पूर्ण १०० विक्रीसाठी गुंतवणूकदारांचा आग्रह होता.
‘पवनहंस’च्या विक्रीसाठी लवकरच निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:27 AM