व्होडाफोन-आयडिया (Vi) ने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी दोन नवीन RedX Family Plan लाँच केले आहेत. या अंतर्गत लाँच करण्यात आलेले दोन प्लॅन्स एक फॅमिली प्लॅन्स आहेत. या प्लॅनचा वापर कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य करू शकता. नवीन पोस्टपेड प्लॅनची किंमत 1699 रुपये आणि 2299 रुपये प्रति महिना आहे. तुम्हाला प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित डेटाची सुविधादेखील देण्यात आली आहे. यापूर्वीपासून कंपनी १०९९ रूपयांचा एक RedX प्लॅन ऑफर करत आहे. परंतु त्याचा वापर एकाच व्यक्तीला करता येत आहे.
1,699 रुपयांचा Vi RedX Family Plan1,699 रुपयांचा Vi RedX Family Plan हा कुटुंबातील तीन जणांना वापरता येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह महिन्याला अनलिमिटेड डेटा आणि ३ हजार एसएमएस मिळतात. याशिवाय कंपनी ग्राहकांना Amazon Prime, Netflix आणि Hotstar VIP च्या वर्षभराच्या मेंबरशिपसह Vi Movies and TV VIP अॅक्सेस, 7 दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग पॅक आणि डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंजचा अक्सेस देते.
2,299 रूपयांचा Vi RedX Family Planहा प्लॅन 1,699 रूपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहे. परंतु यामध्ये एका व्यक्तीला नाही, तर कुटुंबातील ५ व्यक्तींना हा प्लॅन वापरता येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह महिन्याला अनलिमिटेड डेटा आणि ३ हजार एसएमएस मिळतात. याशिवाय कंपनी ग्राहकांना Amazon Prime, Netflix आणि Hotstar VIP च्या वर्षभराच्या मेंबरशिपसह Vi Movies and TV VIP अॅक्सेस, 7 दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग पॅक आणि डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंजचा अक्सेस देते.
या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा पोस्टपेड प्लॅन सहा महिन्यांच्या लॉक इन पिरिअडसह येतो. याचाच अर्थ युझर्सना किमान सहा महिन्यांसाठी हा प्लॅन वापरावा लागेल. जर ग्राहकांना लॉक इन पिरिअड संपण्यापूर्वी यातून बाहेर पडायचं असल्यास कंपनीला ३ हजार रूपयांची एक्झिट फी द्यावी लागेल.