Join us

कायम विनाअनुदानित कर्मचार्‍यांचे वेतन द्या

By admin | Published: June 30, 2014 10:43 PM

कृती समितीचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

कृती समितीचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदननाशिक : मूल्यांकनात पात्र ठरलेल्या कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन त्वरित मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिलेल्या खासगी माध्यमिक शाळांचे १५ नोव्हेंबर २०११ च्या अन्वये मूल्यांकन करण्यात आले. त्यात १ मार्च २०१४ व जून २०१४ मध्ये पात्र ठरलेल्या शाळांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. या माध्यमिक शाळांवर काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन काम करत आहेत. या माध्यमिक शाळांत गेल्या १० ते १५ वर्षांपासून आदिवासी ग्रामीण, तसेच शहरी भागातील ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपासमारीचे जीवन जगत असून, त्यांचे त्वरित वेतन मिळावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळात बाळासाहेब ढोबळे, भारत भामरे, जगदीश मोरे, दशरथ जाधव, विश्राम मुरकुटे, माधव भुजाडे, राजेंद्र मोरे, रमेश ठाकरे, सचिन बाविस्कर यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)