credit card bill : गेल्या काही वर्षांत भारतात क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. मेट्रो शहरांव्यतिरिक्त, आता टियर टू आणि थ्री शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. खरेदीपासून ते प्रवासापर्यंत आणि रेस्टॉरंटचे बिल भरण्यापासून ते तिकिटे बुक करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अनेक लोक सीबील स्कोअर चांगला करण्यासाठी जाणीवपूर्वक क्रेडीट कार्ड वापरतात. पण, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटबाबत अनेक लोकांच्या मनात गैरसमज असतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिलिंग सायकलच्या शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्ड बिल भरल्याने क्रेडिट स्कोअरला खराब होतो का?
शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्ड बिल भरल्यास CIBIL स्कोअरवर परिणाम होतो का?
शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्ड बिल भरल्यास तुमच्या सीबील किंवा क्रेडिट स्कोअरवर कुठलाही परिणाम होत नाही. पण, जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेनंतर भरले तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर निश्चितच परिणाम होतो.
मोबाईल किंवा अन्य कोणताही ऑनलाईन बिल उशीरा भरलं तर?
मोबाईल, वीज बिलांचा अद्याप CIBIL स्कोअरमध्ये समावेश केलेला नाही. सीबील स्कोअरमध्ये फक्त क्रेडिट बिले समाविष्ट आहेत. क्रेडिट बिल म्हणजे क्रेडिट कार्ड बिल, गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयचा संदर्भ. एखाद्या व्यक्तीने कर्ज किंवा क्रेडिट कार्ड बिलाचा ईएमआय भरण्यास विलंब केला किंवा तो चुकला तरच त्याचा सिबिल स्कोअर खराब होतो. मोबाईल किंवा वीज बिल भरण्यात विलंब किंवा डिफॉल्टचा CIBIL स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही.
CIBIL स्कोअर कसा सुधारायचा?
ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा. यानंतरही जर CIBIL स्कोअरमध्ये सुधारणा झाली संबंधित कंपनीशी संपर्क करा. तुमचा क्रेडिट स्कोअर जारी करणाऱ्या कंपनीला माहिती देऊन तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता.
वाचा - Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर
चांगला CIBIL स्कोअर असणे का महत्त्वाचे आहे?
चांगला CIBIL स्कोअर असल्यास कोणतीही बँक तुम्हाला तात्काळ कर्ज मंजुर करेल. शिवाय तुम्ही बँकेकडून कमी व्याजदरांची मागणी करू शकता. तुम्ही बँकेकडे कमी व्याज मागू शकता. तुमचा CIBIL स्कोअर चांगला असल्याने बँक तुमच्याशी सहमत होईल.