Lokmat Money > बिझनेस न्यूज > WhatsApp वरून पेमेंट करणं आता झालं अधिक सोपं, चॅट कंपोझर बॉक्समध्ये आला ₹ सिम्बॉल

WhatsApp वरून पेमेंट करणं आता झालं अधिक सोपं, चॅट कंपोझर बॉक्समध्ये आला ₹ सिम्बॉल

WhatsApp Pay : इंस्टंट मॅसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आता पेमेंट करणे अधिकच सोपं होणार आहे. WhatsApp कंपनीने गुरुवारी भारतीय युझर्ससाठी आपल्या चॅट कंपोझरमध्ये ₹ सिम्बॉल सादर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:34 PM2021-09-30T22:34:45+5:302021-09-30T22:35:31+5:30

WhatsApp Pay : इंस्टंट मॅसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आता पेमेंट करणे अधिकच सोपं होणार आहे. WhatsApp कंपनीने गुरुवारी भारतीय युझर्ससाठी आपल्या चॅट कंपोझरमध्ये ₹ सिम्बॉल सादर केला आहे.

Paying from WhatsApp is now much easier, the symbol came in the chat composer box | WhatsApp वरून पेमेंट करणं आता झालं अधिक सोपं, चॅट कंपोझर बॉक्समध्ये आला ₹ सिम्बॉल

WhatsApp वरून पेमेंट करणं आता झालं अधिक सोपं, चॅट कंपोझर बॉक्समध्ये आला ₹ सिम्बॉल

नवी दिल्ली - इंस्टंट मॅसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आता पेमेंट करणे अधिकच सोपं होणार आहे. WhatsApp कंपनीने गुरुवारी भारतीय युझर्ससाठी आपल्या चॅट कंपोझरमध्ये ₹ सिम्बॉल सादर केला आहे. कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२१मध्ये ही घोषणा केली आहे. कंपनीने ही घोषणा केली आहे की, कंपोझरमध्ये कॅमेरा आयकॉन आता भारतामध्ये २ कोटींहून अधिक स्टोअर्सवर पेमेंट करण्यासाठी कुठल्याही क्यूआर कोड ने स्कॅन करता येणार आहे. (Paying from WhatsApp is now much easier, the symbol came in the chat composer box)

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपला गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये यूनिफाईट पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय सर्व्हिसला फेजवाइज लाईव्ह करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने मान्यता दिली होती. या दोन अपडेटनंतर व्हॉट्अॅपवर पेमेंट करणे आता सोपे झाले आहे, कारण युझर्स आता चॅट कंपोझरच्या आत दोन आयकॉनिक सिबॉल (₹ सिंबॉल आणि कॅमेरा आयकॉन) यांचा वापर करून पैसे पाठवू शकतील. ₹ रुपयाचा सिंबॉल सुरू झाला आहे. तसेच लवकरच संपूर्ण भारतामध्ये युझर्ससाठी उपलब्ध होईल.

यूनिफाईड पेमेंट इंटरफेस/यूपीआय एक रियल टाईम पेमेंट सिस्टिम आहे. ती मोबाईल अॅपच्या माध्यमातून बँक अकाऊंटमध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँक अकाऊंला अनेक यूपीआय अॅपशी लिंक करू शकता. तसेच अनेक बँक अकाऊंटला एका यूपीआय अॅपच्या माध्यमातून संचालित करू शकता. 

Web Title: Paying from WhatsApp is now much easier, the symbol came in the chat composer box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.