Join us

UPI Payment : इंटरनेटशिवायही करता येते UPIवरून पेमेंट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 3:27 PM

UPI Payment News : अनेकदा स्लो इंटरनेट किंवा नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने UPIवरून पेमेट होत नाही. मात्र एक पद्धत अशीही आहे ज्याचा वापर करून तुम्ही इंटरनेटशिवायही UPIवरून पेमेंट करू शकता.

नवी दिल्ली - गेल्या काही काळात यूपीआयवरून पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा स्लो इंटरनेट किंवा नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने UPIवरून पेमेट होत नाही. मात्र एक पद्धत अशीही आहे ज्याचा वापर करून तुम्ही इंटरनेटशिवायही UPIवरून पेमेंट करू शकता. ऑफलाईन पेमेंट करण्यासाठी एक USSD कोड असतो. तो तुम्ही फोनच्या डायलरवरून अॅक्सेस करू शकता. ही सेवा सर्व मोबाईल युझर्ससाठी उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये नेट कनेक्टिव्हिटीची गरज नसते.

USDD ज्याबाबत आम्ही येथे सांगत आहोत. तो *99# हा आहे. म्हणजेच तुम्हाला इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला फोनमध्ये जाऊन *99# डायल करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक मेनू येईल. यामध्ये तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी सेंड मनीचा पर्याय दिसेल. सेंड मनीचा पर्याय ऑप्शन नंबर १ वर असतो. त्यामुळे तुम्हाला १ लिहून USDD वर रिप्लाय द्यावा लागेल. म्हणजेच तुम्हाला १ लिहावं लागेल आणि सेंड पर्यायावर क्लिक करावं लागेल. 

येथे पुन्हा अनेक पर्याय तुमच्यासमोर दिसतील. यामध्ये कुणाचा मोबाईल क्रमांक, यूपीआय, बँक अकाऊंटवर पैसे पाठवण्याचा पर्याच मिळेल. त्यामधील ज्या पर्यायावर पैसे पाठवायचे असतील तो पर्याय सिलेक्ट करा.

त्यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायाच्या हिशोबाने पैसे रिसिव्ह करणाऱ्याच्या बँक अकाऊंट, यूपीआय आयडी किंवा मोबाईल क्रमांक देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पेमेंटबाबत रिमार्क द्यावा लागेल. ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमची यूपीआय पिन द्यावी लागेल. पिन दिल्यावर तुमचे ट्रान्झॅक्शन कुठल्याही इंटरनेटशिवाय पूर्ण होईल.

टॅग्स :व्यवसाय