भारत आपली पेमेंट सर्व्हिस सिस्टम रुपेचा अनौपचारिक आणि औपचारिक पद्धतीनं प्रचार करत असल्याची तक्रार व्हिसा इंकनं (Visa Inc.) अमेरिकन सरकारकडे केली आहे. यामुळे अमेरिकन कंपनी व्हिसालाभारतात व्हिसाला नुकसान झाल्याचा दावाही कंपनीनं केला आहे. भारत हा व्हिसासाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे. याशिवाय रूपे आणि व्हिसा या स्पर्धक कंपन्या आहेत.
सार्वजनिकपणे Visa ने RuPay च्या वाढीबद्दल कमी चिंता व्यक्त केली. परंतु अमेरिकन सरकारच्या मेमोमध्ये असं दिसून आलं आहे की व्हिसानं ९ ऑगस्ट रोजी यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) कॅथरीन आणि सीईओ अल्फ्रेड केली यांच्यासह कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान, भारतील रुपे बाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.
Mastercard Inc नं खाजगीरित्या USTR सोबत अशीच चिंता व्यक्त केली आहे. व्हिसा भारताच्या अनौपचारिक आणि औपचारिक धोरणांबद्दल चिंतित आहे आणि ते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या व्यवसायाच्या बाजूनं दिसतंय असं यूएसटीआर मेमोमध्ये नमूद करण्यात आलंय.
NPCI ही नॉन प्रॉफिटेबल संस्था आहे, जी RuPay चं कामकाज पाहते. नोव्हेंबर २०२० पर्यंत भारतातील ९५२ दशलक्ष डेबिट आणि क्रेडिट कार्डांपैकी ६३ टक्के हा RuPay चा वाटा होता. २०१७ मध्ये हा वाटा फक्त १५ टक्के होता. यापूर्वी मे महिन्यात केली यांनी रुपेची वाढत्या प्रवेशामुळे व्हिसासाठी संभाव्य समस्या उद्भवू शकतात अशी काळजी व्यक्त केली होती. पण आपली कंपनी भारतातील मार्केट लीडर राहिली आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.