मुंबई : डायअमोनियम फॉस्फेट व इतर रासायनिक खते तयार करणाºया भारतातील युनायटेड फॉस्फोरस लिमिटेडच्या (यूपीएल) ३०० दशलक्ष डॉलर्सच्या (१,९५० कोटी रु.) कर्जरोख्यांना न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात सहापट प्रतिसाद मिळाला आहे.
या कर्जरोख्यांवर प्रतिवर्षी ४.५ टक्के व्याज मिळेल व १० वर्षांनंतर परतफेड होणार आहे. त्यातून उभारण्यात आलेल्या ३०० दशलक्ष डॉलर्सपैकी ७५ टक्के रक्कम यूपीएल दीर्घ मुदतीच्या कर्ज फेडीसाठी तर उरलेली २५ टक्के रक्कम अल्पमुदतीच्या कर्ज फेडीसाठी वापरणार असल्याची माहिती कंपनीने दिली.
हे कर्जरोखे यूपीएलने मॉरिशसमधील यूपीएल कॉर्पोरेशन या उपकंपनीमार्फत विक्रीसाठी आणले होते. यूपीएल कॉर्पोरेशन यूपीएलचा जगभरातील व्यवसायाचे नियमन करते. सध्या यूपीएलची वार्षिक उलाढाल १८,००० कोटी रुपये आहे.
या कर्जरोख्यांना प्रतिसाद देणाºया गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बँक आॅफ टोकियो, मित्सुबिशी यूएफजे (एमयूएफजे), क्रेडिट स्युईस, एएनझेड बँकिंग समूह, डीबीएस बँक व जे.पी. मॉर्गन या जगप्रसिद्ध कंपन्या आहेत.
विशेष म्हणजे यूपीएलच्या या कर्जरोख्यांसाठी जगभरातून एकूण १८०० दशलक्ष डॉलर्स (१०,७०० कोटी रु.) भरणा प्राप्त झाला होता. पण त्यापैकी केवळ ३०० दशलक्ष डॉलर्स ठेवून यूपीएलने उरलेली १५०० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूकदारांना परत केली आहे.
यूपीएलच्या ३०० दशलक्ष डॉलरच्या कर्जरोख्यांना सहापट प्रतिसाद
डायअमोनियम फॉस्फेट व इतर रासायनिक खते तयार करणाºया भारतातील युनायटेड फॉस्फोरस लिमिटेडच्या (यूपीएल) ३०० दशलक्ष डॉलर्सच्या (१,९५० कोटी रु.) कर्जरोख्यांना न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात सहापट प्रतिसाद मिळाला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:52 AM2018-03-04T00:52:22+5:302018-03-04T00:52:22+5:30