Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'हे' Payment App १ एप्रिलपासून होणार बंद; पाहा कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल अकाऊंट

'हे' Payment App १ एप्रिलपासून होणार बंद; पाहा कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल अकाऊंट

२०१७ मध्ये कंपनीनं सुरू केली होती सेवा, सध्या कंपनीकडे आहेत १०० दशलक्ष मेंबर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:33 PM2021-02-07T15:33:40+5:302021-02-07T15:40:10+5:30

२०१७ मध्ये कंपनीनं सुरू केली होती सेवा, सध्या कंपनीकडे आहेत १०० दशलक्ष मेंबर्स

PayPal is shutting down domestic payments business in India | 'हे' Payment App १ एप्रिलपासून होणार बंद; पाहा कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल अकाऊंट

'हे' Payment App १ एप्रिलपासून होणार बंद; पाहा कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल अकाऊंट

Highlights२०१७ मध्ये कंपनीनं सुरू केली होती सेवासध्या कंपनीकडे आहेत १०० दशलक्ष मेंबर्स

सध्या अनेक जण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याला प्राधान्य देतात. कोरोना महासाथीच्या काळात भारतात डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. परंतु एक अमेरिकन कंपनी आता भारतातून काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहे. PayPal ही कंपनी भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. PayPal होल्डिंग इंक्सनं १ एप्रिलपासून आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं या अ‍ॅपचा वा पर करणाऱ्यांना आता दुसऱ्या अ‍ॅपची मदत घ्यावी लागणार आहे. 

१ एप्रिलपासून कंपनी आपली भारतातील सेवा बंद करणार आहे. आता कंपनी आपली डोमेस्टिक पेमेंट सेवा बंद करणार असून कंपनी आता क्रॉस बॉर्डर व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं PayPal कडून सांगण्यात आलं. “१ एप्रिल २०२१ पासून आम्ही आपलं संपूर्ण लक्ष भारतीय व्यवसायांसाठी अधिक आंतरराष्ट्रीय विक्री सक्षम करण्यावर केंद्रित करू. याचाच अर्थ आम्ही १ एप्रिलपासून डोमेस्टिक पेमेंट सेवा सुरू ठेवणार नाही," असं कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. 

२०१७ मध्ये सेवेला सुरूवात 

PayPal नं २०१७ पासून भारतात आपली सेवा सुरू केली होती. PayPal ही एक वेबसाईट आहे ज्याच्या मदतीनं ऑनलाईन पेमेंट करता येतं. परदेशातही पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी या अॅपचा वापर करण्यात यायचा. याव्यतिरिक्त याच्या सहाय्यानं युझर्सना खरेदीदेखील करता येत होती. सध्या PayPal चे १९० देशांमध्ये युझर्स असल्याची माहिती समोर आली आहे. 

अकाऊंट डिअ‍ॅक्टिवेट करायचंय?

PayPal चे युझर्स अ‍ॅपचा वापर करतात ते आपला अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट करू शकतात. यासाठी युझर्सना PayPal च्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यांतर सेटिंग्सवर क्लिक करू अकाऊंट ऑप्शनवर जाऊन आपला अकाऊंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर क्लोझ अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट होईल. तर ईमेलद्वारेही तुम्हाला तुमचं अकाऊंट बंद करता येईल. 

Web Title: PayPal is shutting down domestic payments business in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.