नवी दिल्ली : पेटीएम (Paytm) वापरणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. पेटीएमने आता ग्राहकांना कोणताही क्यूआर कोड स्कॅन करण्यास मंजूरी दिली आहे. अर्थात आता ग्राहक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून भीम यूपीआय आणि गूगल पे यासारख्या अॅपचे क्यूआर कोड स्कॅन करुन पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करु शकतात.
कंपनीच्या या निर्णयाचा लहान दुकानदारांना जास्त फायदा होणार आहे. लहान दुकानदारांना या सुविधेच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टिमला जोडण्याची सेवा मिळेल आणि थेट आपल्या बँक खात्यात पैसे जमा करता येतील.
आम्ही सतत पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांना फ्लेक्सिबिलीटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ग्राहक पेटीएम अॅपच्या माध्यमातून कोणताही क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करु शकतात. या सेवेमुळे कोणत्याही अडचणी शिवाय लगेच पेमेंट होऊ शकते. मोठ्या संख्येने लोक पेटीएम यूपीआयसोबत आपले बँक अकाउंट लिंक करत आहेत, असे पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक एबोट यांनी सांगितले.
याचबरोबर, जवळची स्टोअर्स, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, फार्मसी, हॉस्पिटल यांच्यासह अनेक ठिकाणी डिजिटल पेमेंट करत आहेत. आम्ही पेटीएममध्ये नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. त्यामुळे आम्हाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही दिपक एबोट म्हणाले.