नवी दिल्ली : तुम्ही जर पैशांच्या व्यवहारासाठी पेटीएमचा (Paytm) वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या युजर्ससाठी बंपर कॅशबॅक ऑफर (Paytm cash offer) आणली आहे.
पेटीएम कंपनीने 6 ते 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत होणाऱ्या पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे आणि टी-20 सामन्यांदरम्यान यूपीआय (UPI) मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर बक्षिसे जाहीर केली आहेत.
नवीन युजर्स सामन्याच्या दिवशी '4 का 100 कॅशबॅक ऑफर'चा लाभ घेऊ शकतील. पेटीएमची ही ऑफर नवीन युजर्ससाठी आहे. सामन्यादरम्यान युजर्संना खात्रीशीर कॅशबॅक ऑफर मिळेल. जर तुम्ही पेटीएम यूपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर केल्यास तुम्हाला 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.
'या' क्रिकेटपटूंनीही केले पैसे ट्रान्सफर
याशिवाय, युजर्स रेफरल प्रोग्राममध्ये सहभागी होऊन अतिरिक्त कॅशबॅक देखील जिंकू शकतात. ज्यावेळी एखादा युजर्स मित्रांना आणि कुटुंबीयांना UPI मनी ट्रान्सफरसाठी पेटीएम वापरतो, त्यावेळी तो रेफरर आणि रेफरी दोघांकडून 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतो. पेटीएमने ऑफरचा प्रचार करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल, हरभजन सिंग आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू ख्रिस गेल यांच्यासोबत ऑनलाइन अभियान सुरू केले होते.
लेगस्पिनर चहलने हरभजन सिंगच्या अकाऊंटमध्ये चार रुपये पाठवले आहेत. यावर हरभजन सिंगने चहलला विचारले की, मला 4 रुपये का पेटीएम केले आहेस? हरभजनच्या या ट्विटला चहलनेही मजेशीर उत्तर दिले. त्यांनी लिहिले, "पाजी पेटीएमवर एक नवीन ऑफर आहे...4 रुपये पाठवा आणि 100 रुपयांचा कॅशबॅक मिळवा."
काय आहे ऑफर?
पेटीएमने ट्विट करून आपल्या नवीन ऑफरची माहिती दिली आहे. पेटीएमची ही नवीन ऑफर म्हणजे '4 रुपये पाठवा आणि 100 रुपयांचा कॅशबॅक (Cashback)मिळवा', अशी आहे.
कसा घेऊ शकता लाभ?
युजर्स आपले पेटीएम अॅप वापरून काही मिनिटांत पेटीएम यूपीआयसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि कोणताही यूपीआय क्यूआर (UPI QR) कोड स्कॅन करून सहजपणे पैसे पाठवू शकतात.