Join us

Paytm'च्या सीईओंनी RBI ची बंदी झुगारली, आता 'हे' काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 10:02 PM

काल आरबीआयने Paytm वर कारवाई केली आहे.

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल पेटीएमच्या बँकिंग सेवेवर मोठी कारवाई केली. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. पेटीएम २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. 

नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. दरम्यान, फिनटेक कंपनी पेटीएमवर आरबीआयने लादलेल्या बंदीला सामोरे जावे लागत आहे. नियमांचे उल्लंघन आणि अनुपालनाशी संबंधित समस्यांमुळे, RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारी २०२४ पासून विविध प्रकारच्या सेवा देण्यावर बंदी घातली आहे. कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, पेटीएम आदेशाचे पालन करण्यासाठी पावले उचलत आहे आणि ते इतर बँकांसोबत काम करेल.

आरबीआयच्या बंदीनंतर पेटीएम पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत काम करणार नसल्याचे विजय शेखर शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. याउलट कंपनी इतर बँकांसोबत काम करताना दिसेल.

संपूर्ण अंतरिम बजेट १० पॉईंटमध्ये समजून घ्या; तुम्हाला नक्की काय मिळाले हे कळेल

गुरुवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि पेटीएम आधीच नोडल खाती इतर बँकांमध्ये हलवण्याचे काम करत आहेत. विजय शेखर शर्मा म्हणाले की, आरबीआयने आम्हाला कोणतेही वेगळे तपशील पाठवलेले नाहीत. पेटीएम याला फक्त स्पीड बंप मानते. मात्र बँकांच्या भागीदारीवर आमचा विश्वास आहे आणि येत्या काही दिवसांत आम्ही ते पाहू.

अध्यक्ष आणि सीओओ भावेश गुप्ता म्हणाले की, कंपनी इतर अनेक भागीदारांसोबत काम करत आहे. इक्विटी आणि विमा क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले की, आरबीआयच्या निर्णयाचा त्यावर परिणाम होणार नाही कारण दोघेही स्वतंत्रपणे काम करतात.

याआधी मंगळवारी आरबीआयने पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्स आणि पेटीएम पेमेंट्स बँकेची नोडल खाती बंद केली होती. यामुळे PPB ला भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिटसह फंड ट्रान्सफर, UPI सेवा यासारख्या सेवा देणे बंद झाले आहे.

टॅग्स :पे-टीएमभारतीय रिझर्व्ह बँक