Lokmat Money > बिझनेस न्यूज > FASTag डिलीट करण्यासोबत पोर्ट करण्याचीही सुविधा; जाणून घ्या, काय करावे लागेल?

FASTag डिलीट करण्यासोबत पोर्ट करण्याचीही सुविधा; जाणून घ्या, काय करावे लागेल?

Paytm FASTag Port : आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला डिपॉझिट किंवा टॉप-अप स्वीकारण्यास बंदी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:48 PM2024-02-23T15:48:36+5:302024-02-23T15:49:15+5:30

Paytm FASTag Port : आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला डिपॉझिट किंवा टॉप-अप स्वीकारण्यास बंदी घातली आहे.

paytm fastag port or delete know details | FASTag डिलीट करण्यासोबत पोर्ट करण्याचीही सुविधा; जाणून घ्या, काय करावे लागेल?

FASTag डिलीट करण्यासोबत पोर्ट करण्याचीही सुविधा; जाणून घ्या, काय करावे लागेल?

Paytm FASTag Port : (Marathi News) अलीकडेच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) बंदी घातली आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांचा किंवा चालकांचा फास्टॅग (FASTag) पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत लिंक करण्यात आला आहे, ते आता दुसऱ्या बँकेतून फास्टॅग जारी करण्याचा विचार करत आहेत. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI)  अलीकडेच अधिकृत बँकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पेटीएम पेमेंट्स बँकेचा समावेश नाही. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला डिपॉझिट किंवा टॉप-अप स्वीकारण्यास बंदी घातली आहे.

NHAI ने जाहीर केलेल्या अधिकृत बँकांच्या यादीत एअरटेल पेमेंट्स बँक, अलाहाबाद बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक, कॉसमॉस बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि फेडरल बँक इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, जर तुमच्या पेटीएम फास्टॅग अकाउंटमध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही 15 मार्चनंतरही ते वापरू शकता. पण तुम्ही ते टॉप अप करू शकणार नाही. आता प्रश्न असा आहे की, तुम्हाला काय करणे सोपे होईल? अशा परिस्थितीत, तुमच्याकडे तुमचे फास्टॅग अकाउंट डिलीट करण्याचा तसेच ते पोर्ट करण्याचा पर्याय आहे.

FASTAG  अकाउंट डिलीट कसे करावे?
नवीन अकाउंट तयार करण्यासाठी, युजर्सला पेटीएम पेमेंट्स बँकेतून त्याचे अकाउंट हटवावे किंवा डिलीट करावे लागेल. फास्टॅग अकाउंट डिलिट करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
> सर्वात आधी युजर आयडी, वॉलेट आयडी आणि पासवर्ड वापरून फास्टॅग पेटीएम पोर्टलवर लॉग इन करा.
> यानंतर Help and Support वर क्लिक करा.
> आता फास्टॅग प्रोफाइल अपडेट करण्याशी संबंधित प्रश्न निवडा.
> येथे 'I Want to Close My FASTag' हा पर्याय निवडा.

- याशिवाय, तुम्ही तुमचा फास्टॅग दुसऱ्या बँकेत पोर्ट करू शकता. पेटीएम बँकेकडून दुसऱ्या सेवा प्रदात्यावर फास्टॅग पोर्ट करण्यासाठी, तुम्हाला दुसऱ्या बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधावा लागेल.

Web Title: paytm fastag port or delete know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.