Paytm IPO flop : शेअर बाजारात पेटीएमचा Paytm (One 97 Communications Ltd.) आयपीओ (IPO) आतापर्यंतचा सर्वात खराब ओपनिंग इश्यूपैकी एक आहे. दरम्यान, असे असले तरीही पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचा उत्साह कमी झालेला नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांनी स्वतःची तुलना टेस्लाचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांच्याशी केली आहे.
विजय शेखर शर्मा यांनी स्वत: आणि टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांच्यातील अनेक समानता दर्शविल्या आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, विजय शेखर शर्मा यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना उत्साही करण्यासाठी सोमवारी चार तासांच्या टाउनहॉलचे आयोजन केले. यावेळी 43 वर्षीय विजय शेखर शर्मा यांनी आपल्या कर्मचार्यांना भूतकाळाकडे पाहण्यास आणि टेस्लाच्या इतिहासातून शिकण्यास सांगितले.
खरंतर, इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्लाचा स्टॉक एकेकाळी जगातील सर्वाधिक विकल्या जाणार्या स्टॉकपैकी एक होता. परंतु अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कंपनी शेवटी जागतिक स्तरावर सर्वात मान्यताप्राप्त ब्रँड बनली. तसेच जगातील सर्वात मौल्यवान ऑटोमेकर बनली. विशेष म्हणजे, जुलै 2020 मध्ये, जेव्हा टेस्लाने टोयोटा मोटर कॉर्पला मागे टाकून जगातील सर्वात मोठी ऑटोमेकर कंपनी बनली, तेव्हा विजय शेखर शर्मा यांनी एलॉन मस्कचे कौतुक ट्विटद्वारे केले होते.
पेटीएमचे शेअर्स सोमवारीही आपटलेपेटीएममध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा झटका लागला आहे. पेटीएमच्या शेअर्सना गुरूवारी लिस्टिंगनंतरच 20 टक्क्यांचे लोअर सर्किट लावण्यात आले होते. यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका लागला आहे. घसरणीचे सत्र सोमवारीही कायम राहिले होते. पेटीएमचा शेअर सोमवारी 14 टक्क्यांच्या घसरणीसह 1343.70 रूपयांवर ट्रेड करत होता. लिस्टिंगनंतर 2 दिवसांमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांची घसरण झाली आहे.
विजय शेखर शर्मा यांच्या संपत्तीत घटपेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांची संपत्ती 2 सेशन्समध्येच 781 मिलियन डॉलर्स पेक्षा अधिक कमी झाली आहे. IPO ओपनिंगपूर्वी कंपनीमध्ये त्यांच्या हिस्स्याचे मूल्य इश्यू प्राईजनुसार 2156 रूपयांनुसार 2.3 अब्ज डॉलर्स होते. One 97 Communications Ltd. मध्ये विजय शेखर शर्मा यांचा हिस्सा 9.1 टक्के होता. विजय शेखर शर्मा यांच्याकडे कंपनीनमध्ये 2.1 कोटी ऑप्शन्सही आहेत.