Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm IPO Listing: 10000 रुपयांत सुरु केला बिझनेस, इंग्रजी येत नव्हती; पेटीएमचे मालक विजय शेखर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

Paytm IPO Listing: 10000 रुपयांत सुरु केला बिझनेस, इंग्रजी येत नव्हती; पेटीएमचे मालक विजय शेखर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

Vijay Shekhar Sharma In Tears On Listing Day: अनेक उद्योगपतींचे एक स्वप्न असते की बीएसईच्या पॉडियममधून आपली कंपनीचे शेअर लिस्ट करावेत. शेखरचे हे स्वप्न आज पूर्ण झाले, परंतू याच वेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 01:52 PM2021-11-18T13:52:28+5:302021-11-18T13:54:45+5:30

Vijay Shekhar Sharma In Tears On Listing Day: अनेक उद्योगपतींचे एक स्वप्न असते की बीएसईच्या पॉडियममधून आपली कंपनीचे शेअर लिस्ट करावेत. शेखरचे हे स्वप्न आज पूर्ण झाले, परंतू याच वेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. 

Paytm IPO Listing: Business started at Rs.10000, didn't know English, Vijay Shekhar cried, Emotional | Paytm IPO Listing: 10000 रुपयांत सुरु केला बिझनेस, इंग्रजी येत नव्हती; पेटीएमचे मालक विजय शेखर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

Paytm IPO Listing: 10000 रुपयांत सुरु केला बिझनेस, इंग्रजी येत नव्हती; पेटीएमचे मालक विजय शेखर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथून केवळ 10000 रुपये खिशात असताना 11 वर्षांपूर्वी एक तरुणाने व्यवसाय सुरु केला होता. आज याच व्यवसायाने मोठी झेप घेतली आहे. हा उद्योग म्हणजे पेटीएम (Paytm). ही पेटीएम उभारणाऱ्या विजय शेखर शर्मांसाठी ( Vijay Shekhar Sharma) आजचा दिवस खूप खास होता. अनेक उद्योगपतींचे एक स्वप्न असते की बीएसईच्या पॉडियममधून आपली कंपनीचे शेअर लिस्ट करावेत. शेखरचे हे स्वप्न आज पूर्ण झाले, परंतू याच वेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. 

हे आजवर केलेल्या संघर्षाचे अश्रू होते. केवळ 10 हजार रुपयांत त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. त्यांना इंग्रजीही बोलता येत नव्हती. पेटीएम लिस्टिंग समारंभात जेव्हा राष्ट्रगीत वाजू लागले तेव्हा 43 वर्षीय शेखर भावूक झाले. त्यांनी हिंदीमध्ये लोकांना संबोधित केले. भारत भाग्य विधाता हा शब्द मला खूप खूश करतो, असे म्हणत त्यांनी तुम्ही राष्ट्रगीत लावल्याने आता माझ्यासोबत असे होत आहे, असे ते म्हणाले. 

डोळ्यांतील अश्रू रुमालाने पुसत त्यांनी सांगितले की, आजचा दिवस कंपनीसाठी खूप महत्वाचा आहे. लोकांनी मला विचारले की एवढी जास्त किंमत ठेवली तर तुम्ही कंपनीसाठी कसे पैसे गोळा करणार? मी किंमतीसाठी नाही तर उद्देशासाठी पैसे गोळा करत आहे. 

लिस्ट झाल्या झाल्याच पेटीएमचा शेअर गडगडला. बीएसईवर हा शेअर 1955 रुपयांनी लिस्ट करण्यात आला. याचा इश्यू प्राईज 2150 रुपये होती. यामुळे लिस्ट होतानाच गुंतवणूकदारांना 195 रुपयांचे नुकसान झाले. यानंतर शेअर 20 टक्क्यांनी गडडला. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये शेअर 1705.55 रुपयांपर्यंत कोसळला होता. 
 

Web Title: Paytm IPO Listing: Business started at Rs.10000, didn't know English, Vijay Shekhar cried, Emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.