Join us

Paytm IPO listing: पेटीएमचे शेअर घेऊन पस्तावलाय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या आता काय करता येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 3:40 PM

Paytm Shares Fall by 20% after IPO listing: बीएसईवर लिस्ट झाल्या झाल्याच पेटीएमचा शेअर गडगडला. बीएसईवर हा शेअर 1955 रुपयांनी लिस्ट करण्यात आला. गुंतवणूकदारांना अपेक्षा होती पण उलटेच घडले.

देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (Paytm) ने शेअर बाजारात आज एन्ट्री केली. परंतू गुंतवणूकदार मात्र डुबले. शेअरची बेस प्राईज 9 टक्के डिस्काऊंटने ठेवली, तर त्याहून कहर म्हणजे लिस्ट होताच पेटीएमचे शेअर 20 टक्क्यांनी गडगडले. उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथून केवळ 10000 रुपये खिशात असताना 11 वर्षांपूर्वी एक तरुणाने व्यवसाय सुरु केला होता. तो पेटीएमचा मालक विजय शेखर शर्मां आज बीएसईवर पेटीएम लिस्ट झाला तेव्हा रडले. आजवरच्या संघर्षामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

बीएसईवर लिस्ट झाल्या झाल्याच पेटीएमचा शेअर गडगडला. बीएसईवर हा शेअर 1955 रुपयांनी लिस्ट करण्यात आला. याची इश्यू प्राईज 2150 रुपये होती. यामुळे लिस्ट होतानाच गुंतवणूकदारांना 195 रुपयांचे नुकसान झाले. यानंतर शेअर 20 टक्क्यांनी गडगडला. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये शेअर 1,586.25 रुपयांपर्यंत कोसळला होता. 8 नोव्हेंबरला गुंतणूकदारांनी घाऊक खरेदी केली होती. त्यांना मोठा परतावा मिळेल अशी आशा होती. पेटीएमचा आयपीओ देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ (IPO) आहे. 18,300 कोटींच्या या आयपीओला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. ग्रे मार्केटमध्ये 7 नोव्हेंबरला हा शेअर  2,300 रुपयांवर ट्रेंड करत होता. ही किंमत इश्यू प्राईजपेक्षा 150 रुपयांनी जास्त आहे. आता या गुंतवणूकदारांनी काय करायचे? तुम्ही पेटीएमचे शेअर घेतले असतील तर काय करता येईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा...

शेअर बाजाराच्या तज्ज्ञांचे मत आहे की, ज्या गुंतवणूकदारांना पेटीएमचे शेअर मिळाले आहेत, त्यांनी तो 1720 रुपयांच्या लेव्हलला विकून टाकावा. ज्या लोकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फिनटेत कंपन्यांचे शेअर हवे आहेत त्यांनी दुसऱ्या अन्य पर्यायांकडे पहावे. वृत्तपत्र मिंटनुसार Swastika Investmart Ltd चे हेड ऑफ रिसर्च संतोष मीणा यांनी सांगितले की, आक्रमक गुंतवणूकदारांनीच दीर्घ काळासाठी पेटीएमचे शेअर्स आपल्याकडे ठेवावेत. जे खूप काळ पैसा अडकवून ठेवतात. 

Tradingo चे फाऊंडर पार्थ न्याती यांनी यावर सांगितले की, कंपनी सतत नुकसानीत आहे. तसेच भविष्यात जवळपास फायद्यात येण्याची शक्यता नाहीय. यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी नफ्यासाठी पैसा लावला आहे, ते यातून बाहेर पडू शकतात. पेटीएम ऐवजी दुसऱ्या कंपन्या पहाव्यात. पेटीएमने ब्रँडमुळे जास्त व्हॅल्यूएशन लावले, यामुळे भविष्यात आणखी शेअर घसरू शकतात.  

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार