Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुढील आठवड्यात ओपन होणार Paytm चा IPO; पाहा किती होऊ शकते कमाई

पुढील आठवड्यात ओपन होणार Paytm चा IPO; पाहा किती होऊ शकते कमाई

जर तुम्हाला Paytm च्या IPO द्वारे कमाई करायची असेल तर पुढील आठवड्यामध्ये याची संधी मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:25 PM2021-11-03T17:25:37+5:302021-11-03T17:25:57+5:30

जर तुम्हाला Paytm च्या IPO द्वारे कमाई करायची असेल तर पुढील आठवड्यामध्ये याची संधी मिळणार आहे.

paytm ipo opens next week price band gmp and other details know how much you can earn | पुढील आठवड्यात ओपन होणार Paytm चा IPO; पाहा किती होऊ शकते कमाई

पुढील आठवड्यात ओपन होणार Paytm चा IPO; पाहा किती होऊ शकते कमाई

जर तुम्हाला Paytm च्या IPO द्वारे कमाई करायची असेल तर पुढील आठवड्यामध्ये याची संधी मिळणार आहे. Paytm चा आयपीओ ८ नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे आणि १० नोव्हेंबर रोजी बंद होईल. याच दरम्यान गुंतवणूकादारांना आयपीओसाठी अप्लाय करावं लागेल. समोर आलेल्या माहितीनुसार १८ नोव्हेंबर रोजी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे.

कंपनीनं आयपीओसाठी प्राईसबँड २०८० ते २१५० रूपयांच्या दरम्यान ठेवला आहे आणि ६ शेअर्सची एक लॉट साईज निश्चित करण्यात आली आहे. प्राईस बँड आणि लॉट साईजनुसार किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ६ शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी प्राईस बँड नुसार १२९०० रूपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार आयपीओमध्ये कमाल १५ लॉटसाठी अप्लाय करू शकतील. यासाठी त्यांना १,९३,५०० रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

किती होऊ शकते कमाई?
अनलिस्टेड मार्केटमध्ये Paytm इश्यूचा३ नोव्हेंबर रोजी ग्रे मार्केट प्रीमिअम (GMP) १३५ रूपयांच्या जवळ आहे. Paytm च्या शेअरची इश्यू प्राईज २०८० ते २१५० रूपयांदरम्यान आहे. या हिशोबानं Paytm चे अनलिस्टेड शेअर्स २२८५ रूपये (2150+135) रूपयांवर ट्रेड करत आहेत. Paytm चा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. यापूर्वी Coal India नं १५ हजार कोटी रूपयांचा आयपीओ लाँच केला होता. Paytm IPO चे OFS मध्ये कंपनीचे संस्थापक ४०२.६५ कोटी रूपयांचा आपला हिस्सा विकणार आहेत.

Web Title: paytm ipo opens next week price band gmp and other details know how much you can earn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.