Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएमसी बँक खातेधारकांना आता पेटीएमचा झटका; बंद केल्या 'या' सुविधा

पीएमसी बँक खातेधारकांना आता पेटीएमचा झटका; बंद केल्या 'या' सुविधा

RBIच्या धक्कातंत्रानंतर आता मोबाइल पेमेंट कंपनी असलेली पेटीएमनं पीएमसी बँकेच्या लाखो ग्राहकांना नोटीस जारी करून एक प्रकारचा झटका दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 04:52 PM2019-10-06T16:52:05+5:302019-10-06T16:52:37+5:30

RBIच्या धक्कातंत्रानंतर आता मोबाइल पेमेंट कंपनी असलेली पेटीएमनं पीएमसी बँकेच्या लाखो ग्राहकांना नोटीस जारी करून एक प्रकारचा झटका दिला

paytm issues important notice for users invested via pmc bank | पीएमसी बँक खातेधारकांना आता पेटीएमचा झटका; बंद केल्या 'या' सुविधा

पीएमसी बँक खातेधारकांना आता पेटीएमचा झटका; बंद केल्या 'या' सुविधा

नवी दिल्लीः पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेनं 24 सप्टेंबरला एक नोटीस पाठवून बँकेच्या व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी प्रतिबंध घातले आहेत. आरबीआयच्या या निर्बंधांमुळे पीएमसी बँक कोणतंही नवं कर्ज देऊ शकत नाही. तसेच कोणताही ग्राहक 25 हजार रुपयांहून अधिकची रक्कम बँकेतून काढू शकत नाही. या प्रकरणात अनेकांना अटक झाली असून, अंमलबजावणी संचालनालय गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधेशी (HDIL) संबंधित इतर कंपन्यांचीही चौकशी करत आहे.

RBIच्या धक्कातंत्रानंतर आता मोबाइल पेमेंट कंपनी असलेली पेटीएमनं पीएमसी बँकेच्या लाखो ग्राहकांना नोटीस जारी करून एक प्रकारचा झटका दिला आहे. पेटीएमनं 4 ऑक्टोबरला एक ट्विट करत नोटीस पाठवली आहे, त्यात पेटीएम वापरणाऱ्या पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा समावेश आहे. पेटीएमनं पीएमसी बँकेच्या माध्यमातून होणारी सर्व ऑटो पेमेंट सिस्टम बंद केलेली आहेत. तसेच SIPच्या माध्यमातून करण्यात आलेली गुंतवणूकही ठरवलेल्या वेळेत होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पेटीएनं नेट बँकिंग व यूपीआयच्या माध्यमातून होणारी पेमेंट्सची सेवाही पीएमसी बँकेच्या ग्राहकांना बंद केलेली आहे. पेटीएमनं सांगितलं की, पीएमसी बँकेशिवाय इतर अन्य बँक अकाऊंटला आपल्या पेटीएम खात्याशी लिंक करा, पेटीएम जवळपास 200हून अधिक बँकांना सपोर्ट करतो, नव्या खात्याची 30 मिनिटांच्या आत खातरजमा केली जाते. पेटीएम युजर्सनं अन्य बँक खात्यांशी संबंधित अकाऊंट जोडल्यास त्यांना एसआयपी आणि इतर गुंतवणुकीत जमा असलेला पैसा काढता किंवा इतर ठिकाणी फिरवता येणार आहे.  

Web Title: paytm issues important notice for users invested via pmc bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.