मुंबई - डिजिटल आर्थिक सेवा देणारी कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स(One97 Communications) चे मालक विजय शेखर यांनीच कंपनीचे ११ कोटींचे १.७ लाख शेअर खरेदी केले आहेत. विजय शेखर यांनी ३०-३१ मे दरम्यान शेअर खरेदी केल्याचं Paytm कंपनीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे Paytm ला पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचे शुभसंकेत मिळाले असल्याची जोरदार चर्चा शेअर बाजारात सुरू आहे.
विजय शेखर शर्मा यांनी ३० मे रोजी ६.३१ कोटींचे १ लाख ५५२ शेअर्स आणि ३१ मे रोजी ४.६८ कोटींचे ७१ हजार ४६९ शेअर्स खरेदी केले. शुक्रवारी दुपारी बाजारात कंपनीचा शेअर ६२५.७५ रुपयांवर होता. आयपीओनुसार एका सेलिंग शेअरधारकाला कमीत कमी ६ महिने शेअर खरेदी करण्याची परवानगी नव्हती. जी मुदत आता संपलेली आहे. हे निर्बंध हटवल्यानंतर शर्मा यांनी पेटीएमचे शेअर्स खरेदी केले आहेत. याआधी एप्रिलमध्ये शर्मा यांनी गुंतवणूकदारांना पत्र लिहून पुढील सहा तिमाहीत ऑपरेटिंग ESOP कॉस्ट प्राप्त करेल असं म्हटलं होते.
या पत्रात लिहिलं होतं की, आम्ही व्यवसायात धोरणात्मक बदल केल्यानं त्याचा फायदा होईल. पुढील सहा तिमाहीत त्याचे सकारात्मक परिणाम EBITDA वर होतील. आम्ही कुठल्याही योजनेशी तडजोड न करता हे लक्ष्य गाठू शकतो असं सांगितले. गोल्डमॅन सचच्या मे रिपोर्टमध्ये म्हटलंय की, सध्याच्या शेअरची किंमत भारतातील सर्वात मोठ्या वेगाने वाढणाऱ्या फिनटेकला गाठू शकतो. पेटीएम आयपीओ किंमत २१५० रुपये प्रति शेअर होती. परंतु नोव्हेंबरमध्ये लिस्टिंग झाल्यापासून सातत्याने शेअर्सच्या किंमतीत घट होत आहे. पेटीएमनं शेअरनं आतापर्यंत ५११ रुपये निच्चांक गाठला आहे. परंतु काळ तो ६०० रुपयांपर्यंत होता.
मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस पेटीएम मजबूत स्थितीत आहे. चौथ्या तिमाहीत महसूलात ८९ टक्के वाढ होऊन १ हजार ५४१ कोटींपर्यंत पोहचला. दरवर्षीच्या तुलनेने ही वाढ २१० टक्के होती. २०२१-२२ मध्ये वार्षिक कमाई ७७ टक्के वाढून ४ हजार ९७४ कोटीवर पोहचली. ज्यात योगदान लाभ ३१३ टक्क्यांनी वाढून १ हजार ४९८ कोटींवर पोहचला.