Join us

Paytm Money आता सुरू करणार नवीन इनोव्हेशन सेंटर, अनेकांना मिळणार रोजगार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:18 PM

Paytm Money : पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार कंपनीला आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंजिनीअरिंगच्या सशक्त प्रतिभेची आवश्यकता आहे.

नवी दिल्ली : पेटीएम मनी (Paytm Money) आता पुण्यात टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची योजना तयार करीत आहे. यासाठी कंपनी मोठ्या संख्येने रोजगारही उपलब्ध करुन देणार आहे. गुरुवारी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. पेटीएम मनी नवीन वेल्थ प्रोडक्ट्स आणि सर्व्हिससाठी  250 हून अधिक फ्रंट-एंड, बॅक-एंड इंजीनिअर्स आणि डेटा वैज्ञानिकांची नियुक्ती करणार आहे. (paytm money to open new centre in pune paytm achieves over 14 bn transactions in march )

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, "पेटीएम मनी रिटेल गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक आणि वेल्थ क्रिएशन  सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि पुण्यात नवीन सर्व्हिस प्रोडक्ट इनोव्हेशनवर लक्ष केंद्रित करेल. विशेषत: इक्विटी, म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डसाठी लक्ष केंद्रित करेल."

पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार कंपनीला आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंजिनीअरिंगच्या सशक्त प्रतिभेची आवश्यकता आहे. ते म्हणाले, 'आम्ही आमच्या ग्राहकांसाठी कमी किमतीच्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि एक ठोस, नाविन्यपूर्ण आणि स्थिर व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू'.

पुण्याची इनोव्हेशन सेंटर बनविण्याच्या दिशेने वाटचालवरुण श्रीधर म्हणाले, 'पुणे उच्च गुणवत्तेच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, पुणे चांगल्या पायाभूत सुविधांचा आणि उत्कृष्ट हवामानासाठी आहे. आमचा म्हणणे आहे की, पुणे फिनटेकसाठी एक नाविन्यपूर्ण केंद्र (इनोव्हेशन सेंटर) बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि पेटीएम मनीच्या विस्तार योजनांसाठी देखील एक नैसर्गिक पर्याय सुद्धा होता.'

मार्चमध्ये 1.4 अब्ज डिजिटल पेमेंट ट्रांजक्शनडिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने म्हटले आहे की, त्याचे मासिक डिजिटल पेमेंट ट्रांजक्शन 1.4 अब्जांवर गेले आहेत. ऑफलाईन पेमेंट्स आणि वित्तीय सेवांमध्ये वाढ झाल्यामुळे हा आकडा गाठण्यात यश आले आहे असा कंपनीचा दावा आहे. 

पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव यांनी निवेदनात म्हटले आहे की, आमच्या युजर्संनी मोठ्या संख्येने पेटीएम सह डिजिटल प्रवास सुरू केला. आता त्यांनी आमच्या आर्थिक सेवा स्वीकारल्या आहेत. यादव म्हणाले की, फेरीवाले, छोटे दुकानदार आमचा साऊंडबॉक्स स्वीकारत आहेत, ज्यामुळे डिजिटल पेमेंटवर अवलंबून राहण्यास मदत झाली आहे, कारण आता त्यांना प्रत्येक पेमेंटची पुष्टी (कंफर्मेशन) मिळते.

टॅग्स :पे-टीएमव्यवसायऑनलाइनपुणे