Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm मध्ये नवे फीचर, Wallet बॅलन्सने सुद्धा करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

Paytm मध्ये नवे फीचर, Wallet बॅलन्सने सुद्धा करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

paytm : कंपनी सतत आपल्या अ‍ॅपमध्ये नव-नवीन फीचर्स आणत असते. त्यानुसार, आता पेटीएमच्या वॉलेट बॅलन्सद्वारे (Wallet Balance) क्रेडिट कार्ड बिल (Credit Card Bill) देखील पेमेंट करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:36 PM2021-05-19T18:36:23+5:302021-05-19T18:36:56+5:30

paytm : कंपनी सतत आपल्या अ‍ॅपमध्ये नव-नवीन फीचर्स आणत असते. त्यानुसार, आता पेटीएमच्या वॉलेट बॅलन्सद्वारे (Wallet Balance) क्रेडिट कार्ड बिल (Credit Card Bill) देखील पेमेंट करू शकता.

paytm new feature credit card bill payments through wallet balance | Paytm मध्ये नवे फीचर, Wallet बॅलन्सने सुद्धा करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

Paytm मध्ये नवे फीचर, Wallet बॅलन्सने सुद्धा करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

Highlightsक्रेडिट कार्ड बिल भरताना सहसा क्रेडिट कार्डचा ऑप्शन उपलब्ध नसतो. परंतु पेटीएमच्या नवीन फीचरमुळे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे आपले क्रेडिट कार्ड बिल देखील भरू शकता.

नवी दिल्ली : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएमचे (Paytm) युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. दरम्यान, कंपनी सतत आपल्या अ‍ॅपमध्ये नव-नवीन फीचर्स आणत असते. त्यानुसार, आता पेटीएमच्या वॉलेट बॅलन्सद्वारे (Wallet Balance) क्रेडिट कार्ड बिल (Credit Card Bill) देखील पेमेंट करू शकता. (paytm new feature credit card bill payments through wallet balance)

आतापर्यंत पेटीएमकडून क्रेडिट कार्ड बिल भरताना वॉलेटद्वारे पेमेंट करण्याचा कोणताही पर्याय नव्हता. परंतु आता पेटीएम अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्ड बिल भरताना यूपीआय, पेटीएम बँक, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग व्यतिरिक्त पेटीएम वॉलेट बॅलन्स देखील पेमेंटचा एक ऑप्शन असेल. जर तुमच्या वॉलेटमध्ये पैसे नसल्यास क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करतेवेळी तुम्ही अॅड मनी करू शकत नाही. यासंबंधीचे वृत्त न्यूज १८ हिंदीने दिले आहे.

Paytm अ‍ॅपवर असे करा क्रेडिट कार्डचे बिलाचे पेमेंट
१) सर्वात आधी Paytm अ‍ॅप्लिकेशन अपडेट करा.
२) Paytm अ‍ॅप ओपक करा आणि All Service वर क्लिक करा.
३) यानंतर Monthly Bills वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Credit Card Bill चा ऑप्शन दिसून येईल.
४) जर तुम्ही पहिल्यांदा कोणत्याही कार्डचे पेमेंट करणार असाल तर Pay Bill For New Credit Card वर क्लिक करा.  यानंतर कार्ड नंबर अपलोड करून Proceed वर क्लिक करा.
५) आता पेमेंट मोड सिलेक्ट करा. यानंतर पेटीएम वॉलेट बॅलन्स, यूपीआय, पेटीएम बँक, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करा. विशेष म्हणजे, वॉलेट बॅलन्सपासून पेमेंट केल्यास कोणतेही एक्स्ट्रा चार्ज लागत नाही.

क्रेडिट कार्डद्वारेही करू शकता क्रेडिट कार्ड बिल पेमेंट
क्रेडिट कार्ड बिल भरताना सहसा क्रेडिट कार्डचा ऑप्शन उपलब्ध नसतो. परंतु पेटीएमच्या नवीन फीचरमुळे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे आपले क्रेडिट कार्ड बिल देखील भरू शकता. यासाठी तुम्हाला आधी आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरावे (मनी अ‍ॅड) लागतील. दरम्यान, क्रेडिट कार्डसह वॉलेटमध्ये पैसे भरल्यानंतर 2.07-3.07 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागते. क्रेडिट कार्ड बिल भरताना आता तुम्ही वॉलेट बॅलन्स वापरू शकता.

Web Title: paytm new feature credit card bill payments through wallet balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.