Paytm News:भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) चर्चेत आहे. दरम्यान, Paytm payment Bank चे सीईओ विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी आज राजीनामा दिला आहे. शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेचे नॉन-एग्झीक्यूटिव्ह चेअरमन आणि बोर्ड सदस्य पद सोडले आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सने स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली.
Vijay Shekhar Sharma steps down from Board of Paytm Payments Bank; Board of Directors reconstituted
— ANI Digital (@ani_digital) February 26, 2024
Read @ANI Story | https://t.co/lvq79BaU6w#Paytm#VijayShekharSharma#PaytmPaymentsBankpic.twitter.com/v8lzorst7E
आर्थिक अनियमिततेच्या कारणास्तव 29 जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध लादले होते. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. नंतर आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 15 मार्च 2024 पर्यंत दिलासा दिला.
बोर्डाची पुनर्रचना
विजय शेखर शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर हे बोर्डाचे सदस्य असतील. याशिवाय सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि निवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल हे बोर्डाचे सदस्य असतील.
सल्लागार समिती स्थापन
दरम्यान, आरबीआयच्या कारवाईनंतर 9 फेब्रुवारी रोजी पेटीएमने म्हटले होते की, बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे माजी अध्यक्ष एम दामोदरन यांच्या नेतृत्वाखाली एक गट सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. 3 सदस्यांच्या या समितीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) चे माजी अध्यक्ष एमएम चितळे आणि आंध्र बँकेचे माजी सीएमडी आर रामचंद्रन यांचा समावेश आहे.