Paytm News : पेटीएम ब्रँडचे संचालन करणाऱ्या One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर होल्डर्सनी विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. म्हणजेच विजय शेखर शर्मा पेटीएमचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, 99.67 टक्के शेअरधारकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले.
Vijay Shekhar Sharma reappointed Paytm MD, CEO; 99.67 pc shareholders vote in his favour
— ANI Digital (@ani_digital) August 21, 2022
Read @ANI Story | https://t.co/WMWvEpQiX6#Paytm#VijayShekharSharmapic.twitter.com/shEcyoslkI
एजीएममध्ये घेतलेला निर्णय
One97 Communications ने रविवारी दाखल केलेल्या अहवालात ही माहिती दिली. अहवालानुसार, शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 99.67 टक्के शेअर होल्डर शर्मा यांच्या या पदावर पुनर्नियुक्तीच्या बाजूने होते, तर केवळ 0.33 टक्के शेअर होल्डर्सनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. गुंतवणूक सल्लागार फर्म IIAS ने शर्मा यांची या पदावर पुनर्नियुक्ती करण्याविरुद्ध शिफारस केली होती.
शर्मा यांनी अनेक आश्वासने दिली
कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी शर्मा यांनी यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती, परंतु ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत, असे आयआयएएसने म्हटले होते. शर्मा यांच्यासह चेअरमन आणि ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर मधुर देवरा यांच्या पगाराच्या पॅकेजलाही शेअरधारकांनी मंजुरी दिली. सुमारे 94.48 टक्के भागधारकांनी शर्मा यांच्या मानधनाच्या बाजूने मतदान केले तर 5.52 टक्के लोकांनी विरोध केला. देवरा यांच्या मानधन मंजूर करण्याच्या प्रस्तावाच्या बाबतीतही असेच समर्थन दिसून आले.