Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm Offer: क्रेडिट कार्ड बिल भरल्यावर 1 लाखांपर्यंत मिळवा कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या प्रोसेस

Paytm Offer: क्रेडिट कार्ड बिल भरल्यावर 1 लाखांपर्यंत मिळवा कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या प्रोसेस

Paytm Offer : या दिवसांमध्ये पेटीएम वर एक जबरदस्त ऑफर चालू आहे, ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंटवर एक लाख पर्यंत कॅशबॅक पॉईंट्स जिंकू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 07:52 PM2021-08-08T19:52:30+5:302021-08-08T19:53:08+5:30

Paytm Offer : या दिवसांमध्ये पेटीएम वर एक जबरदस्त ऑफर चालू आहे, ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंटवर एक लाख पर्यंत कॅशबॅक पॉईंट्स जिंकू शकता.

paytm is offering up to 1 lakh cashback points or rs 1000 on credit card bill payments | Paytm Offer: क्रेडिट कार्ड बिल भरल्यावर 1 लाखांपर्यंत मिळवा कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या प्रोसेस

Paytm Offer: क्रेडिट कार्ड बिल भरल्यावर 1 लाखांपर्यंत मिळवा कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : आज मार्केटमध्ये क्रेड (CRED), पेटीएम (Paytm), मोबिक्विक (Mobikwik), फोनपे (Phonepe), अॅमेझॉन (Amazon) सारखे अनेक थर्ड पार्टी मोबाईल अॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिलाचे (Credit Card Bill) पेमेंट करत असल्यास तुम्हाला कॅशबॅक देखील मिळते. तसेच, या दिवसांमध्ये पेटीएम वर एक जबरदस्त ऑफर चालू आहे, ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंटवर एक लाख पर्यंत कॅशबॅक पॉईंट्स जिंकू शकता. (paytm is offering up to 1 lakh cashback points or rs 1000 on credit card bill payments)

100 पेटीएम कॅशबॅक पॉईंट्सची व्हॅल्यू 1 रुपयाबरोबर
मिळवलेले कॅशबॅक पॉइंट्सला रिडीम करून पेटीएम गिफ्ट व्हाउचर किंवा इतर इक्साइटिंग रिवार्ड्समध्ये बदल केले जाऊ शकते. म्हणजेच, 100 पेटीएम कॅशबॅक पॉईंटचे व्हॅल्यू 1 रुपयाच्या (1 रुपयाचे पेटीएम गिफ्ट व्हाउचर) बरोबर असते. जर तुम्ही 1 लाख कॅशबॅक पॉईंट्स रिडीम केले, तर 1000 रुपयांचे पेटीएम गिफ्ट व्हाउचर मिळू शकते. हे गिफ्ट व्हाउचर तुमच्या पेटीएम बॅलन्समध्ये अॅड होते.

ऑफरच्या अटी
1. तुम्हाला पेटीएमद्वारे कमीतकमी 5000 रुपयांचे क्रेडिट कार्ड बिल भरावे लागेल.
2. याद्वारे तुम्हाला 1000 ते एक लाखापर्यंत कोणताही कॅशबॅक पॉईंट मिळू शकतो. याचा अर्थ तुम्हाला 10 रुपयांपासून 1000 रुपयांदरम्यान कोणतीही रक्कम मिळू शकते.
3. या ऑफरचा एका महिन्यात 5 वेळा लाभ घेता येईल. (प्रति कार्ड एका व्यवहारापर्यंत मर्यादित)
4. ही ऑफर निवडलेल्या वापरकर्त्यांसाठी वैध आहे.
5. ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत आहे.


Paytm अॅपवर असे करा क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट
>> सर्वप्रथम Paytm अॅप अपडेट करा.
>> आता Paytm अॅप उघडा आणि All Service वर क्लिक करा.
>> यानंतर Monthly Bills वर क्लिक केल्यावर तुम्हाला Credit Card Bill चा ऑप्शन दिसेल.
>> जर तुम्ही पहिल्यांदा कार्ड पेमेंट करण्याचा विचार करत असाल तर Pay Bill For New Credit Card वर क्लिक करा. त्यानंतर कार्ड क्रमांक टाकून Proceed वर क्लिक करा. जर तुम्ही आधी पेमेंट केले असेल तर तुम्हाला ते कार्ड दिसेल.
>> आता पेमेंट मोड सिलेक्ट करा. त्यानंतर पेटीएम वॉलेट बॅलन्स, यूपीआय, पेटीएम बँक, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करा. विशेष गोष्ट म्हणजे वॉलेट बॅलन्समधून पैसे भरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.

Web Title: paytm is offering up to 1 lakh cashback points or rs 1000 on credit card bill payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.