नवी दिल्ली : सध्या घरगुती गॅसच्या (LPG gas) किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत आहे. पण पेटीएमवर एलपीजी बुकिंगवर (Paytm offer on LPG booking) एक उत्तम ऑफर आहे, ज्या अंतर्गत तुम्ही एलपीजी बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक (Cashback) मिळवू शकता.
तुम्ही हा कॅशबॅक तीन वेळा मिळवू शकता. सिलिंडर बुक करण्यासाठी, तुम्हाला पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करावे लागेल. दरम्यान, ही ऑफर फक्त अशा लोकांसाठी आहे, ज्यांनी पेटीएमद्वारे अद्याप गॅस बुकिंग केले नाही. तुम्ही तुमचे गॅस सिलिंडर पेटीएमद्वारे आधीच बुक केले, असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी नाही.
या ऑफरची सविस्तर माहितीपेटीएम वापरून पहिल्या तीन गॅस सिलिंडर बुकिंगवर प्रति बुकिंग 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक पहिल्या बुकिंगवर 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत असू शकतो. दुसरा आणि तिसरा सिलिंडर बुक केल्यावर, तुम्हाला स्क्रॅच कार्डमध्ये 5 ते 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.
काय आहे ऑफरसाठी पात्रता?जसे की आधीच सांगितल्याप्रमाणे, ऑफर फक्त त्या ग्राहकांसाठी आहे, जे पेटीएम अॅप वापरून पहिल्यांदा बुकिंग करत आहेत. ही ऑफर किमान 500 रुपयांच्या बुकींगवरच वैध मानली जाईल, जी गॅस सिलिंडरची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त सल्यामुळे होईल. तुम्ही पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे गॅस सिलेंडर बुकिंगचे पेमेंट केले तरच तुम्हाला या ऑफरसाठी पात्र मानले जाईल. पेटीएम वॉलेटवरून पेमेंट करताना, जर युजर्सने संपूर्ण रक्कम इतर कोणत्याही पेमेंट मोडद्वारे ट्रांजक्शन केली तर ती वैध मानली जाणार नाही.
पहिला सिलिंडर कोणत्या तारखेला बुक करावा लागेल?पेटीएमच्या ऑफरबद्दल माहिती देताना, असे म्हटले आहे की, ग्राहकाला डिसेंबर 2021 पर्यंत त्याचे पहिले सिलेंडर बुकिंग / पेमेंट करावे लागेल. यानंतर ऑफर अॅक्टिव्हेट होईल आणि ग्राहकाला पहिले कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. तसेच, ग्राहकाला उर्वरित दोन बुकिंग पुढील 2 महिन्यांत पूर्ण करावे लागतील.
कधी मिळेल स्क्रॅच कार्ड? कधी येईल कॅशबॅक?सक्सेसफुल बुकिंग केल्यानंतर, तुम्हाला एक स्क्रॅच कार्ड मिळेल, जे तुम्ही उघडून तुमच्या कॅशबॅकचा क्लेम करू शकता. स्क्रॅच कार्ड कोणत्याही परिस्थितीत उघडले नसल्यास, तुम्ही कॅशबॅक आणि ऑफर्स सेक्शनमध्ये जाऊन ते पाहू शकता. दरम्यान, प्रत्येक वेळी सक्सेस ट्रान्जक्शननंतर स्क्रॅच कार्ड सुमारे 24 तासांच्या आत मिळते आणि हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांनी एक्स्पायर होते. स्क्रॅच कार्ड पाहिल्यानंतर 72 तासांच्या आत पेटीएम वॉलेटमध्ये कॅशबॅक जमा होतो.