Lokmat Money > बिझनेस न्यूज > IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, दररोज 1,000 युजर्स जिंकतील बक्षीस

IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, दररोज 1,000 युजर्स जिंकतील बक्षीस

paytm offers : प्रत्येक रिचार्जवर युजर्संना निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील, जे आकर्षक ब्रॅण्ड्सकडून आकर्षक डिल्स आणि गिफ्ट व्हाउचरसाठी रिडीम केले जाऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:53 PM2021-09-23T15:53:31+5:302021-09-23T15:54:16+5:30

paytm offers : प्रत्येक रिचार्जवर युजर्संना निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील, जे आकर्षक ब्रॅण्ड्सकडून आकर्षक डिल्स आणि गिफ्ट व्हाउचरसाठी रिडीम केले जाऊ शकतात.

paytm offers upto 100 pc cashback on mobile data pack recharges during ipl matches | IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, दररोज 1,000 युजर्स जिंकतील बक्षीस

IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, दररोज 1,000 युजर्स जिंकतील बक्षीस

नवी दिल्ली : डिजिटल प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) आज ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी सध्या सुरु असलेल्या आयपीएल हंगामात (IPL Match)मोबाइल रिचार्जवर (Mobile recharge) आकर्षक कॅशबॅक ऑफर (Cashback offer) आणि इतर बक्षिसे जाहीर केली आहेत. दररोज, पहिल्या 1,000 युजर्संसाठी शिफ्ट ब्रेक दरम्यान त्यांचे मोबाईल फोन नंबर रिचार्ज केल्यावर 100% कॅशबॅक (50 रुपयांपर्यंत) मिळेल. (paytm offers upto 100 pc cashback on mobile data pack recharges during ipl matches)

ही ऑफर जिओ (JIO), व्हीआय (VI), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएलच्या  (MTNL) 10 रुपये आणि त्यावरील वरील सर्व रिचार्जवर वैध आहे. याशिवाय, नवीन युजर्सला 11 रुपये, 21 रुपये आणि 51 रुपयांच्या जिओ डेटा पॅक,   16 रुपये आणि 48 रुपयांच्या व्हीआय डेटा पॅक आणि 48 रुपयांचा एअरटेल डेटा पॅकसाठी 1 जीबी डेटाच्या रिचार्ज रकमेच्या बरोबरीचे कॅशबॅक (Cashback) मिळेल.  ही ऑफर आयपीएल सामन्यांदरम्यान(IPL 2021) दररोज संध्याकाळी 7.30 ते रात्री 11 पर्यंत लागू राहील. प्रत्येक रिचार्जवर युजर्संना निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील, जे आकर्षक ब्रॅण्ड्सकडून आकर्षक डिल्स आणि गिफ्ट व्हाउचरसाठी रिडीम केले जाऊ शकतात.

युजर्संना मिळतेय ही खास सुविधा
युजर्संना आणखी अधिक सुविधा देण्यासाठी पेटीएमने अलीकडेच 3-क्लिक इन्स्टंट रिचार्ज आणि युजर फ्रेंडली प्लॅन्स डिस्प्ले सारख्या सुविधांसह मोबाइल बिल पेमेंट अनुभव विस्तृत केला आहे. पेटीएम आपल्या युजर्संना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेटीएम पोस्टपेडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय देते. पेटीएम पोस्टपेडद्वारे, युजर्स आता रिचार्ज करू शकतात आणि नंतर पैसे देऊ शकतात. पेटीएम आपल्या युजर्संना त्यांच्या नवीनतम बिलाची रक्कम आणि त्याचे पेमेंट करण्याची तारीख देखील आठवण करून देते, जेणेकरून  युजर्स पेटीएमसोबत नेहमी जोडलेले असावेत.


जाणून घ्या कंपनीने काय म्हटले आहे?
पेटीएम कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मोबाइल रिचार्ज ही पेटीएमवरील सर्वात लोकप्रिय सेवांपैकी एक आहे. या आगामी क्रिकेट हंगामात आम्ही आमच्या युजर्संना एक स्पेशल ट्रिट देऊ इच्छितो आणि त्यांच्याबरोबर खेळाचा आनंद साजरा करू इच्छितो. या स्पेशल गिफ्टमध्ये 100% पर्यंत कॅशबॅकचा समावेश आहे. दरम्यान,  पेटीएम युजर्स आपले वीज बिल, मोबाईल ब्रॉडबँड आणि डीटूएच रिचार्ज, भाडे पेमेंट, क्रेडिट कार्ड बिलांचे पेमेंट करण्यासोबत ट्रेन किंवा विमान तिकीट बुकिंग, ई-कॉमर्ससह इतर रोज लागणाऱ्या अनेक वस्तूंचे पेमेंट घरी बसून आरामशीर करू शकतात. या व्यतिरिक्त युजर्स या प्लॅटफॉर्मद्वारे म्युच्युअल फंड्स, शेअर्स, डिजिटल गोल्ड आणि आपल्या विमा पॉलिसीचा प्रीमियम देखील भरू शकतात.

Web Title: paytm offers upto 100 pc cashback on mobile data pack recharges during ipl matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.