Paytm Payment Bank:Paytm वर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी Paytm Payment Bankला 5.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (FIU) ने मनी लाँड्रिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केली आहे. FIU ला तपास यंत्रणांकडून पेटीएम पेटेमंट्स बँकेच्या काही बेकायदेशीर हालचालींबद्दल माहिती मिळाली होती. यामध्ये ऑनलाइन जुगार, इ...चा समावेश आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, FIU ने पेटीएम पेमेंट्स बँकेचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणपेटीएम पेमेंट्स बँकेवरील या दंडाबाबत माहिती देताना वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिट - इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेचे काही युनिट्स आणि नेटवर्क ऑनलाइन जुगारासारख्या बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असल्याचे शोधून काढले आहे. या बेकायदेशीर ऑपरेशन्समधून मिळालेले पैसे बँक खात्यांद्वारे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या या युनिट्समध्ये पाठवले गेले. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
यापूर्वी 31 जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर मोठी कारवाई केली होती. सेंट्रल बँकेने पेटीएमची बँकिंग सेवा 29 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ही मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पेटीएमला UPI चालवण्यासाठी RBI कडून हा सल्लापेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी जोडल्या गेल्या असतील, तर 15 मार्चनंतर ते कार्य करणार नाहीत. जर ही सेवा सुरू ठेवायची असेल तर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्यांचे पेटीएम यूपीआय दुसऱ्या बँकेशी लिंक करावे लागेल. याबाबत आरबीआयने नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. RBI ने NPCI ला UPI सिस्टीममध्ये थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हायडर होण्यासाठी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या विनंतीचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन लिमिटेड यासाठी ४-५ बँकांशी संपर्कात आहे.
पेटीएमला 15 मार्चपर्यंत संधी आहेRBI ने म्हटले आहे की UPI अकाउंटचे स्थलांतर फक्त त्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी असेल, ज्यांचे UPI हँडल पेटीएम पेमेंट बँकेशी जोडलेले आहे. आरबीआयचे हे पाऊल पेटीएम पेमेंट बँकेच्या त्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देईल ज्यांचे UPI पेटीएम पेमेंट बँकेशी लिंक नाही.