नवी दिल्ली : अलीकडेच देशात यूपीआय (UPI) सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड सुरू (RuPay Credit Card on UPI) करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही रुपे क्रेडिट कार्ड यूपीआय अॅपशी लिंक करू शकता. या सुविधेसह तुम्ही शेजारच्या दुकानात लावलेला यूपीआय QR कोड स्कॅन करून रुपे क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकाल.
लवकरच ही सुविधा डिजिटल पेमेंट अॅप पेटीएमच्या यूपीआय सेक्शनमध्ये दिसणार आहे. यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत भागीदारी केली आहे. यूपीआयवर रुपे क्रेडिट कार्डच्या सुविधेसह, तुम्ही शेजारच्या दुकानात लावलेल्या यूपीआय QR कोड स्कॅन करून तुमच्या क्रेडिट कार्डने पैसे भरण्यास सक्षम असणार आहे. मात्र, या फीचर्सद्वारे तुम्ही केवळ मर्चेंट यूपीआय QR कोडचे पैसे देऊ शकता. पी 2 पी पेमेंट करू शकत नाही.
BHIM अॅपवर लाईव्ह झाले आहे 4 बँकांचे रुपे क्रेडिटएनपीसीआयद्वारे (NPCI) संचालित भीम अॅप (BHIM App) आणि एचडीएफसी (HDFC) बँकेद्वारे संचालित पेझॅप अॅपवर (PayZapp) 4 बँकांचे रुपे क्रेडिट लाईव्ह झाले आहे. पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि एचडीएफसी बँकेचे रुपे क्रेडिट कार्डधारक त्यांचे कार्ड भीम अॅपशी लिंक करू शकतात. मार्चपर्यंत एसबीआय कार्ड, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड यूपीआयशी जोडण्याची सुविधा देखील सुरू होण्याची शक्यता आहे.
BHIM अॅपसोबत रूपे क्रेडिट कार्ड कसे लिंक करावे?>> सर्वात आधी भीम अॅप ओपन करा.>> यानंतर लिंक केलेल्या बँक खात्यावर क्लिक करा.>> आता + वर क्लिक केल्यावर Add Account मध्ये 2 ऑप्शन दिसतील – Bank Account आणि Credit Card.>> क्रेडिट कार्डवर क्लिक केल्यानंतर संबंधित कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक केलेल्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स येतील.>> आता क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि व्हॅलिडिटी टाका.>> यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.>> UPI पिन तयार करा. अशा प्रकारे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.>> आता मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करा आणि RuPay क्रेडिट कार्ड निवडा आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.