Join us

Paytm पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर, आता FD अकाउंटमधून करू शकता मोबाईल रिचार्ज अन् पेमेंट...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 4:28 PM

paytm payments banks : कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट गेटवे आता फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits) अकाउंट बॅलन्सच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करीत आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँकेचे  (Paytm Payments Bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. दरम्यान, या बँकेचे ग्राहक आता पेमेंट गेटवेद्वारे एफडी अकाउंटमध्ये (Paytm Bank FD) असलेल्या बॅलन्समधून पेमेंट करू शकतात. म्हणजेच, तुम्हाला पेटीएमद्वारे मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज किंवा इतर कोणतेही पेमेंट करायचे असल्यास डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम वॉलेट, पेटीएम बँक सेव्हिंग अकाउंट, नेटबँकिंग आणि यूपीआय व्यतिरिक्त पेटीएम बँक एफडी देखील एक पेमेंट मोड असणार आहे. (paytm payments banks customers can now make payments from fixed deposits account)

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट गेटवे आता फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits) अकाउंट बॅलन्सच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करीत आहे. ही सुविधा पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या सहकार्याने आहे, ज्याचे अकाउंट होल्डर आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इंस्टंट पेमेंट करण्यासाठी आपला एफडी बॅलन्स वापरु शकतात.

इंडसइंड बँकसोबत पार्टनरशिपपेटीएम पेमेंट्स बँकेला फिक्स्ड डिपॉझिटची सुविधा देण्यासाठी प्रत्यक्षरित्या परवानगी नाही. त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेने यासाठी इंडसइंड बँकेबरोबर पार्टनरशिप केली आहे. मात्र, व्याज दर इंडसइंड बँक निर्धारित करते.

पेटीएम पेमेंट्स बँकेत एफडीवर मिळते 5.5% व्याजपेटीएम पेमेंट्स बँकेत एफडीचा मॅच्युरिटी कालावधी 356 दिवसांचा आहे आणि त्यावर 5.5 % व्याज मिळते आहे. या एफडीची खास गोष्ट म्हणजे मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी एफडी तोडण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. मात्र,  तुम्ही 7 दिवसांपूर्वी तोडल्यास तुम्हाला कोणतेही व्याज मिळत नाही.

टॅग्स :पे-टीएमव्यवसायपैसाऑनलाइन