नवी दिल्ली:
कोरोना संकटाच्या काळातही शेअर मार्केटमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून BSE आणि NSE ची घोडदौड उत्तम प्रकारे सुरू असल्याचे दिसत आहे. गुंतवणूकदारांसाठी ही जमेची बाब असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या वर्षात अनेक कंपन्याचे IPO शेअर बाजारात येणार आहेत. यातच आता डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवर असलेली Paytm कंपनी देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. (paytm plans to launch india biggest IPO later this year)
Paytm च्या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त होईल, असे सांगितले जात आहे. देशातील सर्वांत मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असणाऱ्या पेटीएम कडून यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या दरम्यान देशातील सर्वांत मोठा आयपीओ आणणार आहे. एका वृत्तानुसार पेटीएमने आयपीओतून प्राथमिक बाजारातून ३ बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २२ हजार कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष ठेवले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार
आयपीओद्वारे पेटीएम मूल्यांकन वाढवण्याची तयारी
पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सचे संचालक मंडळ आयपीओला मान्यता देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आयपीओद्वारे पेटीएमने आपले मूल्यांकन २५ ते ३० अब्ज डॉलर्स म्हणजेच १.८० लाख कोटी वरुन ते वाढवून २.२० लाख कोटी रुपये करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
HDFC बँकेला दणका! RBI ने ठोठावला १० कोटींचा दंड; नेमके कारण काय?
विद्यमान गुंतवणूकदाराद्वारे शेअर विक्रीसाठी ऑफर
या आयपीओमध्ये नवीन शेअर्ससोबत कंपनी प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदाराद्वारे शेअर विक्रीसाठी ऑफर देतील जेणेकरुन काही कंपन्यांना यातून बाहेर पडता येणार आहे. पेटीएमच्या आयपीओसाठी निवडलेल्या बँकांमध्ये मॉर्गन स्टेनली, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन यासारख्या गुंतवणूकदारांचा समावेश असणार आहे. मॉर्गन स्टेनली लीड मॅनेजर बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. या आयपीओसाठी प्रक्रिया जून किंवा जुलैमध्ये सुरू होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, सेबीच्या नियमांनुसार आयपीओ आणणाऱ्या कंपनीला पहिल्या २ वर्षात १० टक्के तर पुढील ५ वर्षात २५ टक्क्यापर्यंत हिस्सा सामान्यांसाठी खुला करावा लागतो. म्हणजेच कंपनी जास्तीत जास्त ७५ टक्के हिस्सा स्वतः जवळ ठेऊ शकते.