Join us  

UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर..., अशा प्रकारे मिळवा रिफंड!  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 3:06 PM

UPI : तुम्ही चुकून ट्रान्सफर केलेले पैसे परत मिळवू शकता. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

नवी दिल्ली : पेटीएम, गुगल पे किंवा इतर यूपीआयने (UPI) व्यवहार करणे सोपे झाले आहे. तुम्ही मोबाईल नंबरद्वारे किंवा QR कोड स्कॅन करून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहज पैसे पाठवू शकता. पण तुम्ही चुकून चुकीच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवले किंवा फसवणूक करणारा QR कोड स्कॅन केला तर पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. तुमच्यासोबत अशी घटना घडली असेल तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही चुकून ट्रान्सफर केलेले पैसे परत मिळवू शकता. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास असे मिळवा रिफंड...- चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असल्यास सर्वात आधी तुमच्या बँकेला मेल करा. अशी बहुतेक प्रकरणे केवळ मेलद्वारे सोडविली जातात.- पण मेल करूनही तुमचा प्रश्न सुटला नाही, तर तुम्हाला स्वत: बँकेच्या शाखेत जावे लागेल.- तुमची काही महत्त्वाची कागदपत्रेही सोबत घ्या. ही कागदपत्रे तुम्हाला बँकेत जमा करावी लागतील.- असे केल्यावर बँक मॅनेजरचा रिप्लाय येईल आणि तुमचे पैसे बँकेत रिफंड केले जातील.

7 ते 15 दिवसांत रिफंड होतीलरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची बँकेत तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीच्या एका आठवड्यात किंवा 15 दिवसांच्या आत बँक तुमच्या खात्यात पैसे परत करते. म्हणजे ज्या खात्यातून पैसे कापले जातात, त्याच खात्यात परत येतात. तसेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर कोणी तुमच्यावतीने पाठवलेले पैसे खर्च केले किंवा इतर कोणत्याही खात्यात ट्रान्सफर केले, तर अशा परिस्थितीतही बँक तुम्हाला रिफंड देईल. अशा परिस्थितीत, ज्या व्यक्तीने पैसे खर्च केले आहेत, त्या व्यक्तीचा बँक बॅलन्स निगेटिव्ह केला जाईल.

टीप – दरम्यान, बँक फक्त अशाच परिस्थितीत पैसे परत करते, जेव्हा तुम्ही तुमच्या चुकीच्या UPI ट्रान्सफरबद्दल बँकेला वेळेवर माहिती द्याल.

टॅग्स :ऑनलाइनव्यवसाय