Join us

Paytm च्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, पुन्हा होणार कर्मचारी कपात; सुरू झाली प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 3:36 PM

गेल्या काही दिवसांपासून पेटीएम हे नाव चर्चेत आहे. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करत मोठा झटका दिला होता.

Layoff News: गेल्या काही दिवसांपासून पेटीएम हे नाव चर्चेत आहे. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करत मोठा झटका दिला होता. पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन अॅन्युअल परफॉर्मन्स रिव्ह्यूच्या आधारे निरनिराळ्या विभागातून कर्मचारी कपात करणार आहे.  

किती लोकांवर टांगती तलवार? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेटीएम यामध्ये किती लोकांना कमी करणार याची नेमकी संख्या स्पष्ट नाही. काही विभागांना त्यांच्या टीमचा आकार २० टक्क्यांनी कमी करण्यास सांगण्यात आलं आहे. अॅन्युअल परफॉर्मन्स रिव्ह्यूनंतर कर्मचारी कपात होऊ शकतं असं पेटीएमच्या एका प्रवक्त्यानं कबूल केलं आहे. परंतु किती लोकांना काढलं जाईल यासंदर्भात मात्र माहिती देण्यात आलेली नाही. 

एआयच्या माध्यमातून होणार काम? 

आम्ही आमच्या अॅन्युअल असेसमेंट सायकलच्या मध्यात आहोत. कंपन्या हे करत असतात. ही प्रक्रिया कर्मचारी कपातीपासून निराळी आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. जो कोणत्याही संघटनेत परफॉर्मन्स व्हॅल्युएशनचा नियमित भाग आहे. आम्ही एआय ऑपरेटर ऑटोमेशनसोबत ऑपरेशनल बदल कायम ठेवणार आहोत. यामुळे आमचा विकास आणि कॉस्ट एफिशियन्सीसोबत उत्तम ताळमेळ बसवण्यास मदत मिळणार असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं.

टॅग्स :पे-टीएमनोकरी