Join us

आधी रडवलं, आता मालामाल करायला लागला 'हा' शेअर, एका बातमीनंतर शेअरला लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 1:03 PM

सोमवारी कंपनीच्या शेअर्सला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक बातमी आल्यानंतर दिसून आली आहे.

Paytm Share Price: आज पेटीएम शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. सोमवारी कंपनीच्या शेअर्सला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक बातमी आल्यानंतर दिसून आली आहे. Paytm ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला UPI पेमेंटसाठी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन म्हणून काम करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. पाच टक्क्यांचं अपर सर्किट लागल्यानंतर कंपनीचे शेअर्स बीएसईवर ४२७.९५ रुपयांवर पोहोचले आहेत. 

एनसीपीआयला पेटीएमच्या विनंतीवर विचार करण्याचा सल्ला दिला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. नियमांच्या अधीन राहून पेटीएम युपीआयसाठी थर्ड पार्टी अॅप प्रमाणे काम करू शकतो का नाही यावर विचार केला जावा, असं रिझर्व्ह बँकेनं नमूद केलंय. वन 97 कम्युनिकेशनकडे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमधील ४९ टक्के हिस्सा आहे. 

जर पेटीएमला युपीआय पेमेंटसाठी एनपीसीआयकडून मंजुरी मिळाली, तर त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी असेल. मात्र, यासाठी त्यांना ॲपसाठी नवीन बँकेची मदत घ्यावी लागणार आहे. एनपीसीआयनं मोठ्या प्रमाणात युपीआय पेमेंट करणाऱ्या ४ ते ५ बँकांची सुविधा पेटीएमला दिली पाहिजे, असं रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर एनपीसीआयच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारपे-टीएमशेअर बाजार