Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 

Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 

Paytm Share Price : कंपनीच्या शेअर्सनं गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात चांगली कामगिरी केलीये. पाहा सध्या काय आहे स्थिती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 03:58 PM2024-10-14T15:58:58+5:302024-10-14T15:58:58+5:30

Paytm Share Price : कंपनीच्या शेअर्सनं गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात चांगली कामगिरी केलीये. पाहा सध्या काय आहे स्थिती.

Paytm share gave 71 percent return in 90 days now mutual funds increased investment stock on 717 rs | Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 

Paytm Share Price : 'या' शेअरनं ९० दिवसांत दिला ७१% रिटर्न, आता Mutual funds नं वाढवली गुंतवणूक 

Paytm Share Price : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सच्या शेअर्सवर म्युच्युअल फंडांचा विश्वास वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आपला हिस्सा वाढवला आहे. पेटीएमच्या शेअर्सनं गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात चांगली कामगिरी केलीये.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर (३० जून २०२४) पेटीएमच्या शेअरची किंमत ४०२.२० रुपये होती. जो बीएसईमध्ये दुसऱ्या तिमाहीअखेर (३० सप्टेंबर २०२४) ६८८.३५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. म्हणजेच या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमती तब्बल ७१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर किंचित घसरणीसह ७१७.५० रुपयांवर पोहोचला.

म्युच्युअल फंडांचा हिस्सा वाढला

जून तिमाहीअखेर म्युच्युअल फंडांचा पेटीएममध्ये एकूण ६.८० टक्के हिस्सा होता. त्यांच्याकडे पेटीएमचे ४.३२ कोटी शेअर्स होते. तर दुसऱ्या तिमाहीअखेर म्युच्युअल फंडांचा वाटा वाढून ७.८६ टक्के झाला आहे. आता म्युच्युअल फंड कंपन्यांकडे पेटीएमचे सुमारे पाच कोटी शेअर्स आहेत. कंपनीच्या दृष्टीकोनातून ही चांगली बातमी आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्यानं किरकोळ गुंतवणूकदारही कंपनीच्या शेअर्सकडे आकर्षित होत आहेत.

कोणत्या म्युच्युअल फंडांचा किती हिस्सा?

निप्पॉन म्युच्युअल फंडानं पेटीएममधील आपला हिस्सा वाढवला आहे. पहिल्या तिमाहीत निप्पॉनकडे कंपनीचे १.११ कोटी शेअर्स होते. जी दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस वाढून १.४४ कोटी झाली. त्यामुळे कंपनीतील त्यांचा हिस्सा १.७६ टक्क्यांवरून २.२७ टक्क्यांवर गेला. मिराए म्युच्युअल फंडांनंही आपला हिस्सा वाढवला आहे. कंपनीतील त्यांचा हिस्सा आता ४.४९ टक्के झाला आहे.

कंपनीचा शेअर आज बीएसईवर ७३० रुपयांवर उघडला. यानंतर कंपनीच्या शेअरचा भाव 735.80 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे. पेटीएमचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९९८.३० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३१० रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Paytm share gave 71 percent return in 90 days now mutual funds increased investment stock on 717 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.