Join us

Paytm Share Price: सुनिल मित्तल आणणार Paytm ला ‘अच्छे दिन’? Airtel सोबत मर्जरची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 4:37 PM

देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या (Paytm) गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्याची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचा (One 97 Communications) स्टॉक रॉकेट बनू शकतो. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. पेटीएमच्या पेमेंट बँकेत त्याचे वित्तीय सेवा युनिट विलीन करून ते कंपनीत हिस्सा घेऊ शकतात. एअरटेल पेमेंट्स बँकेत पेटीएम पेमेंट्स बँकेत विलीन करण्याची त्यांची इच्छा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही डील स्टॉक्समध्ये होऊ शकते. तसेच, ते इतर होल्डर्सकडून पेटीएम शेअर्स खरेदी करू शकतात. याबाबतची चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे.

पेटीएमची इश्यू प्राईज 2,150 रुपये होती. पेटीएमच्या आयपीओमध्ये अनेक किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. परंतु हा शेअर किधीही त्याच्या इश्यू प्राईजच्या जवळ पोहोचला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेअरची किंमत 439.60 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होती. मात्र त्यानंतर त्यात सुमारे 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी त्यात 2.72 टक्क्यांनी वाढून तो 623.25 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, कंपनी नफ्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कारणास्तव, त्यांच्या शेअर्सना गती मिळाली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा कमी झाला आहे. ग्राहकांची संख्या वाढल्याने त्यांचा महसूल वाढला आहे. जर एअरटेलशी करार झाला तर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होऊ शकते.

काय म्हणतात ब्रोकरेज फर्म?या संदर्भात पेटीएमने ईमेलमध्ये म्हटले आहे की कंपनीचे लक्ष ऑर्गेनिक वाढीवर आहे आणि सध्या कंपनी अशा कोणत्याही चर्चेत सहभागी नाही. भारती एंटरप्रायझेसने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. पेटीएम नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्ट झाली आहे. हे एकेकाळचे देशातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप होते. जपानचा सॉफ्टबँक ग्रुप आणि चीनचा अँट ग्रुप यांची कंपनीत गुंतवणूक आहे. मित्तल यांची एअरटेल पेमेंट बँक सहा वर्षे जुनी असून त्यांचे 12.9 कोटी ग्राहक आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांना नफा झाला होता. ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी पेटीएम आपल्या उत्पादनांची संख्या वाढवत आहे. आठ ब्रोकरेजने कंपनीच्या स्टॉकला बाय किंवा ओव्हरवेट रेटिंग दिले आहे. त्यांचे 12 महिन्यांचे प्राईज टार्गेट 944.64 रुपये आहे.

टॅग्स :एअरटेलपे-टीएमगुंतवणूक