Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेटीएमचे शेअर्स सावरले; आता पुढे काय होणार ?

पेटीएमचे शेअर्स सावरले; आता पुढे काय होणार ?

भांडवल ८५२ कोटी रुपयांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 05:18 AM2024-02-07T05:18:01+5:302024-02-07T05:18:25+5:30

भांडवल ८५२ कोटी रुपयांनी वाढले

Paytm shares recover; What will happen next? | पेटीएमचे शेअर्स सावरले; आता पुढे काय होणार ?

पेटीएमचे शेअर्स सावरले; आता पुढे काय होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : पेटीएम ब्रँडची मालक कंपनी ‘वन९७ कम्युनिकेशन्स’चा समभाग ३ सत्रांच्या तीव्र घसरगुंडीनंतर मंगळवारी वाढला. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) हा समभाग एका क्षणी ७.७९ टक्क्यांच्या तेजीसह ४७२.५० रुपयांवर पोहोचला होता. सत्राअखेरीस तो ३.०२ टक्क्यांच्या तेजीसह ४५१.६० रुपयांवर बंद झाला. 

दरम्यान, पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मागील ३ दिवसांत कंपनीचा समभाग ४२ टक्क्यांपेक्षाही अधिक कोसळला. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल २०,४७१.२५ कोटींनी कमी झाले होते. 

भांडवल ८५२ कोटी रुपयांनी वाढले
nराष्ट्रीय शेअर बाजारात तो ७.९९ टक्क्यांच्या वाढीसह ४७३.५५ रुपयांवर गेला होता. सत्राअखेरीस तो ३.२६ टक्क्यांची वाढ नोंदवून ४५२.८० रुपयांवर बंद झाला.
n पेटीएमच्या समभागातील तेजीमुळे कंपनीचे बाजार भांडवल ८५२.७८ कोटी रुपयांनी वाढून २८,६८०.२३ कोटी रुपयांवर पोहोचले.

Web Title: Paytm shares recover; What will happen next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.