भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी गुरुवारी पेटीएम शेअर्सवर (Paytm Stocks) खरेदीचा सल्ला देऊन ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना आश्चर्यचकित केलं. पेटीएमचा शेअर विकत घ्यावं असं ओरडून ओरडून सांगत आहे, असं अशनीर म्हणाले. आयपीओपासून पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. अशा परिस्थितीत अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या फॉलोअर्सना हा सल्ला दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
"पेटीएमचा शेअऱ खरेदी करण्यासाठी ही योग्य संधी आहे. याचं व्हॅल्यूएशन ७ अब्ज डॉलर्स आहे. स्वत: उभारलेलं फंड ४.६ अब्ज डॉलर्स आहे. कॅश इन हँड १.५ अब्ज डॉलर्स असलं पाहिजे. तर ६०० च्या बाजार मूल्यावर, गेल्या १० वर्षांमध्ये ३.१ अब्ज डॉलर्स खर्च केल्यानंतर क्रिएट झालेली व्हॅल्यू ५.५ अब्ज डॉलर्स आहे. हे बँक FD रेटपेक्षा कमी आहे. BUY!!," असं अशनीर ग्रोव्हर म्हणाले. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
@Paytm stock is a screaming BUY ! It’s valued at $7B ; Funds raised itself is $4.6B ; Cash in Hand should be $1.5 B. So at CMP of ₹600, the market is saying value created is $5.5B after having spent $3.1B over last 10 years. That’s less than Bank FD rate. BUY !!
— Ashneer Grover (@Ashneer_Grover) March 17, 2022
परंतु त्यांच्या ट्वीट्सवरील रिअॅक्शन पाहून लोक त्याचा सल्ला मानण्यास तयार नसल्याचं दिसून येतं. गेल्या चार महिन्यांपासून सातत्यानं पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. पेटीएमचं आयपीओ प्राईज २१५० रुपये ठेवण्यात आली होती. परंतु आता याचे शेअर ७० टक्क्यांपेक्षा अधिक घसरले आहेत, हे मागील कारण असण्याची शक्यता आहे.
गुरूवारीदेखील Paytm च्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. कंपनीचे शेअर ६.२८ टक्क्यांनी घसरून ५९४.२५ रुपयांवर बंद झाले. गेल्या पाच दिवसांत या शेअर्सच्या किंमतीत २३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर २०२२ च्या सुरूवातीपासून पेटीएमचे शेअर ५५.६५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.