Paytm Share Price: पेटीएमच्या शेअर्सच्या लिस्टिंगबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता होती. परंतु लिस्ट झाल्यानंतर मात्र शेअर्सची कामगिरी खराब ठरली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. महिन्याभरात पेटीएमच्या शेअर्समध्ये १५.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर जून तिमाहीबद्दल सांगायचं झालं तर एप्रिल आणि जून दरम्यान पेटीएमच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांची तेजी आली. मात्र बुधवारी पुन्हा एकदा पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात पेटीएमचे शेअर्स ०.१९ टक्क्यांनी घसरून ७३६ रूपयांवर बंद झाले.
काय आहे तेजीचं कारण?
पेटीएमची पेरेंट कंपनी One97 Communications नं दिलेल्या माहितीनुसार फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आणि म्युच्युअल फंड्सनं पेटीएममध्ये गुंतवणूक वाढवली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या जून तिमाहीत शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार पेटीएममध्ये FPIs ची संख्या ५४ वरून वाढून ८३ इतकी झाली आहे आणि कंपनीमध्ये एपीआयची एकूण होल्डिंग २,८६,८०,९४८ वरून वाढून ३.५३,७२,४२८ शेअर्स इतकी झाली आहे.
३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत One97 Communications मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या ३ वरून वाढून १९ झाली आहे. कंपनीमध्ये त्यांची गुंतवणूक आता ७४,०२,३०९ शेअर्सवर पोहोचली आहे.
कसा होता लोन व्यवसाय?
जून २०२२ दरम्यान पेटीएमचं लोन वितरण ५ टक्क्यांनी वाढून ८४.७८ लाखांवर पोहोचलं. रूपयांमध्ये पाहिलं तर त्यात वार्षिक आधारावर ९ टक्क्यांची वाढ दिसून आली आणि ते ५५५४ कोटी रूपयांवर पोहोचले.