गेल्या काही दिवसापासून पेटीएमच्या अडचणी वाढल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर, १ फेब्रुवारी रोजी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी सांगितले होते की, फिनटेक कंपनी पेटीएम पेमेंट्स बँकेचा व्यवसाय हस्तांतरित करेल. काही कंपन्यांशी चर्चा करत आहे. अनेक मोठ्या बँकांनी आमच्याशी संपर्क साधून मदत दिली आहे, असंही शर्मा म्हणाले.
विजय शेखर शर्मा म्हणाले, व्यवसाय हस्तांतरित करताना, तुमचा व्हर्च्युअल पेमेंट पत्ता बदलावा लागेल. भागीदार बँकांशी बोलणी सुरू आहेत, परंतु अद्याप गोष्टी निश्चित झालेल्या नाहीत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. दरम्यान, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे एक मोठे विधान समोर आले आहे.
भारतावर विश्वास, पाकला सुनावलं; आयएमएफ म्हणते... 'विकसित राष्ट्र' अशक्य नाही
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी शनिवारी सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडियाने कंपनीकडून व्यवसाय हस्तांतरित करण्याबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेशी कोणतीही चर्चा केलेली नाही. तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना खारा म्हणाले की, आम्ही काहीही बोललो नाही. त्यांनी आमच्याकडे काही खाती ठेवली आहेत, परंतु व्यवसाय हस्तांतरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. SBI आपल्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
दिनेश खारा म्हणाले की, व्यापारी एसबीआयमध्ये परत येऊ शकतात कारण आम्ही सर्व व्यापाऱ्यांशी संपर्क साधत आहोत आणि पेमेंट सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही याची खात्री करत आहोत. व्यावसायिकांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होईल, असे ते म्हणाले.
'आमच्याकडे SBI पेमेंट आणि इतर सेवा उपलब्ध आहेत. KYC मधील प्रमुख अनियमितता: हे लक्षात घेण्यासारखे आहे की ३१ जानेवारी रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यावसायिक क्रियाकलापांवर बंदी घातली आहे आणि फेब्रुवारीच्या अखेरीस सर्व बँकिंग सेवा बंद करण्यास सांगितले आहे. केवायसीमध्ये मोठी अनियमितता असल्याचे नियामकाला आढळून आले. यामध्ये मोठ्या संख्येने ग्राहकांसाठी केवायसी नसणे देखील समाविष्ट आहे.