Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेटीएम युजर्ससाठी मोफत गॅस सिलिंडर मिळण्याची संधी; जाणून घ्या काय करावे लागेल?

पेटीएम युजर्ससाठी मोफत गॅस सिलिंडर मिळण्याची संधी; जाणून घ्या काय करावे लागेल?

Free LPG cylinder : पेटीएम ग्राहकांना तिन्ही ऑप्शन उपलब्ध असतील. जर तुम्हाला 25 रुपयांची सूट हवी असेल तर तुम्हाला ती लगेच मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:14 PM2022-02-03T19:14:35+5:302022-02-03T19:15:10+5:30

Free LPG cylinder : पेटीएम ग्राहकांना तिन्ही ऑप्शन उपलब्ध असतील. जर तुम्हाला 25 रुपयांची सूट हवी असेल तर तुम्हाला ती लगेच मिळेल.

paytm users can get free lpg cylinder know the offer in detail  | पेटीएम युजर्ससाठी मोफत गॅस सिलिंडर मिळण्याची संधी; जाणून घ्या काय करावे लागेल?

पेटीएम युजर्ससाठी मोफत गॅस सिलिंडर मिळण्याची संधी; जाणून घ्या काय करावे लागेल?

नवी दिल्ली : पेटीएमने (Paytm) आपल्या युजर्ससाठी एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे. पेटीएमकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. एका ऑफर अंतर्गत तुम्हाला 25 रुपयांची सूट मिळू शकते, तर दुसरी ऑफर अशी आहे की, तुम्हाला पेटीएम कॅशबॅक म्हणून 30 रुपये मिळू शकतात. याशिवाय,  तिसरी ऑफर सध्या सुरू आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही एलपीजी सिलिंडर मोफत (Free LPG Cylinder) मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला एक पैसाही द्यावा लागणार नाही.

या सर्व डील्ससाठी एक कॉमन आणि महत्त्वाची अट अशी आहे की, पेटीएमद्वारे तुमचे पहिले गॅस सिलिंडर बुकिंग करावे लागेल. पेटीएम ग्राहकांना तिन्ही ऑप्शन उपलब्ध असतील. जर तुम्हाला 25 रुपयांची सूट हवी असेल तर तुम्हाला ती लगेच मिळेल. जर तुम्हाला 30 रुपयांचा कॅशबॅक हवा असेल तर तुम्हाला पेटीएम कॅश मिळेल. यासाठी वेगवेगळे प्रोमोकोड देण्यात आले आहेत, जे बुकिंगच्या वेळी लागू करावे लागतील. परंतु विनामूल्य, म्हणजे 100 टक्के कॅशबॅक मिळविण्यासाठी तुमच्या नशिबाने सुद्धा तुम्हाला साथ दिली पाहिजे.

मोफत सिलिंडरसाठी अशी प्रोसेस
मोफत एलपीजी सिलिंडर (Free LPG Cylinder) मिळविण्यासाठी, तुम्हाला बुकिंगच्या वेळी FREECYLINDER प्रोमोकोड वापरावा लागेल. सिलिंडर बुक करताना पूर्ण पैसे द्यावे लागतील. यानंतर, पेटीएमच्या प्रत्येक 100 व्या गॅस सिलिंडरची बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला पूर्ण कॅशबॅक (100% Cashback) दिला जाईल. कमाल 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल, याचा अर्थ तुम्हाला फक्त एक सिलिंडर बुक करावा लागेल. वरील ऑफर फक्त 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वैध आहेत. जर तुम्ही 100 वे भाग्यवान ग्राहक असाल तर तुम्हाला 24 तासांच्या आत कॅशबॅक मिळेल.

पेटीएमवर असे करू शकता बुकिंग
तुम्ही Indane, HP Gas आणि BharatGas मधून कोणत्याही कंपनीचे सिलिंडर बुक करू शकता. तुम्हाला 'बुक माय सिलिंडर' टॅबवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा LPG आयडी किंवा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. हे टाकून, तुम्हाला तुमच्या एजन्सीची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंटसाठी तुमच्याकडे पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंगचा पर्याय असेल. बुकिंग झाल्यानंतर हे सिलिंडर एजन्सीद्वारे तुमच्या दिलेल्या पत्त्यावर वितरित केले जाईल.

Web Title: paytm users can get free lpg cylinder know the offer in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.