Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm पुन्हा 'या' लायसन्ससाठी अर्ज करणार, यापूर्वी आरबीआयनं दिलेला नकार

Paytm पुन्हा 'या' लायसन्ससाठी अर्ज करणार, यापूर्वी आरबीआयनं दिलेला नकार

Paytm Share Price: पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या लायसन्ससाठी पुन्हा अर्ज करणार असल्याचा पुनरुच्चार केला. जाणून घ्या कोणता आहे हा लायसन्स आणि काय म्हटलंय कंपनीनं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 02:51 PM2024-09-12T14:51:41+5:302024-09-12T14:52:06+5:30

Paytm Share Price: पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या लायसन्ससाठी पुन्हा अर्ज करणार असल्याचा पुनरुच्चार केला. जाणून घ्या कोणता आहे हा लायसन्स आणि काय म्हटलंय कंपनीनं.

Paytm will reapply for payment aggregator license head vijay shekhar sharma said denied earlier by RBI | Paytm पुन्हा 'या' लायसन्ससाठी अर्ज करणार, यापूर्वी आरबीआयनं दिलेला नकार

Paytm पुन्हा 'या' लायसन्ससाठी अर्ज करणार, यापूर्वी आरबीआयनं दिलेला नकार

Paytm Share Price: पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पेमेंट अॅग्रीगेटर (पीए) परवान्यासाठी पुन्हा अर्ज करण्याचा पुनरुच्चार केला. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे पेमेंट अॅग्रीगेटर लायसन्ससाठी वेळेत अर्ज करू, असंही ते म्हणाले. पेटीएमला नुकतीच आपल्या पेमेंट सर्व्हिसेस व्यवसायात गुंतवणुकीसाठी अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, पेटीएमचा शेअर १.२० टक्क्यांनी घसरून ६५८ रुपयांवर व्यवहार करत होता.

"आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की पीपीएसएलला डाउनस्ट्रीम गुंतवणुकीसाठी कंपनीकडून २७ ऑगस्ट २०२४ च्या पत्राद्वारे भारत सरकार, अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभागाकडून मान्यता मिळाली आहे. या मंजुरीनंतर पीपीएसएल आपल्या पेमेंट एग्रीगेटरकडे अर्ज पुन्हा सादर करणार आहे. दरम्यान, पीपीएसएल विद्यमान भागीदारांना ऑनलाइन पेमेंट सेवा देत राहील." असं पेटीएमनं फायलिंगमध्ये म्हटलं.

यापूर्वी नाकारलं होतं

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) नोव्हेंबर २०२२ मध्ये पेटीएमचा पेमेंट अॅग्रीगेटर लायसन्स परमिट अर्ज फेटाळला होता आणि कंपनीला थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांनुसार प्रेस नोट ३ अनुपालनासह पुन्हा अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. प्रेस नोट ३ नुसार, सरकारनं भारताला लागून असलेल्या देशांमध्ये गुंतवणुकीसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक केली होती. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, पीपीएसएलला २७ ऑगस्ट २०२४ च्या पत्राद्वारे भारत सरकार, अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभागाकडून कंपनीकडून पीपीएसएलमध्ये डाउनस्ट्रीम गुंतवणुकीसाठी मंजुरी मिळाली आहे," असं कंपनीनं एका फायलिंगमध्ये म्हटलं.

Web Title: Paytm will reapply for payment aggregator license head vijay shekhar sharma said denied earlier by RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.