PC Jewellers Share Price : ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर्सचा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांनी वधारून १८६.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनी मंगळवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. गेल्या महिनाभरात पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये ७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीनं आता आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केलीये. पीसी ज्वेलर्सच्या संचालक मंडळाने १:१० या प्रमाणात शेअर स्प्लिट जाहीर केले आहे. म्हणजेच कंपनी आपल्या १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्सची १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या १० शेअर्समध्ये विभागणी करणार आहे.
पीसी ज्वेलर्सनं अद्याप शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. कंपनीनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच रेकॉर्ड डेट जाहीर करणार आहेत. ज्वेलरी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स स्प्लिट करत आहे. पीसी ज्वेलर्सने खासगी प्लेसमेंट तत्त्वावर प्रवर्तक समूहाच्या दोन संस्थांना ११.५० कोटी फुली कन्व्हर्टिबल वॉनरन्ट्सच्या अलॉटमेंटला मंजुरी दिली आहे. वॉरंटची इश्यू प्राइस ५६.२० रुपये प्रति वॉरंट आहे. वॉरंट इश्यूमधून ६४६ कोटी रुपये उभे केले जातील.
वर्षभरात शेअरमध्ये ६१३ टक्क्यांची वाढ
पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ६१३ टक्के वाढ झाली आहे. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी ज्वेलरी कंपनीचा शेअर २६.१९ रुपयांवर होता. १ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर १८६.८० रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये २७१ टक्के वाढ झाली आहे. तर ज्वेलरी कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या २ महिन्यांत २३१% वाढ झाली आहे. पीसी ज्वेलर्सचा शेअर ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १८६.८० रुपयांवर पोहोचला. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २५.४५ रुपये आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)