Join us

पॉन्झी स्कीमचे बळी ठरलेल्या ६ कोटी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; काय आहे सरकारची योजना?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 2:12 PM

Pearl Group Scam : पर्ल ग्रुपने गुंतवणुकीच्या बदल्या प्लॉट देण्याचे आमिष दाखवल्याने कोट्यवधी लोकांना या स्कीममध्ये पैसे गुंतवले होते.

Pearl Group Scam : काही वर्षांपूर्वी पर्ल ग्रुपने पॉन्झी स्कीम काढून तब्बल ६ कोटी गुंतवणूकदारांना हजारो कोटींना गंडा घातला होता. या स्कीममध्ये अनेकजण आपल्या आयुष्यभराची कमाई गमावून बसले. पर्ल ग्रुपच्या पॉन्झी स्कीमला (Ponzi Scheme) बळी पडलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने या फसवणुकीला बळी पडलेल्या सुमारे ६ कोटी गुंतवणूकदारांना ५० हजार कोटी रुपये परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बेकायदेशीरपणे पैसे गोळा केल्याच्या आरोपावरून सेबीने पर्ल ग्रुपवर बंदी घातली होती. कंपनीने १८ वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी गुंतवणूकदारांकडून ही रक्कम घेतल्याचा आरोप होता. या पॉन्झी स्कीममधून गुंतवणूकदारांना भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. सीबीआयने फेब्रुवारी २०१४ मध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.

पर्ल ग्रुपच्या ट्रॅपमध्ये कोट्यवधी लोक अडकलेईडीने जस्टिस लोढा समितीला पर्ल ॲग्रो ग्रुपच्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या जप्त केलेल्या संपत्तीची माहिती दिली आहे. या पॉन्झी स्कीममधील पीडितांना मदत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही समिती स्थापन केली होती. पर्ल ग्रुपने लोकांना भूखंड देण्याच्या बहाण्याने अडकवल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे कोलकातामध्ये रजिस्टर शेल कंपनीला दिले होते. ही रक्कम रोखीत रूपांतरित करून हवालाद्वारे दुबईला पाठवण्यात आली. त्यानंतर या पैशातून हॉटेल आणि रिसॉर्ट्स खरेदी करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियातही प्रॉपर्टीची खरेदीऑस्ट्रेलियातही मोठी रक्कम देऊन मालमत्ता खरेदी केल्याचे तपासादरम्यान उघड झाले. २०१८ मध्ये, ईडीने पर्ल ग्रुप आणि त्याचे प्रवर्तक निर्मल सिंग भांगू यांच्या ४६२ कोटी रुपयांच्या ऑस्ट्रेलियातील २ मालमत्ता जप्त केल्या होत्या. चार वर्षांनंतर २४४ कोटी रुपयांच्या इतर मालमत्ताही जप्त करण्यात आल्या. आता त्यांची किंमत १ हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

२० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या ७८ फ्लॅट ताब्यातअहवालानुसार, ईडीने एसआरएस ग्रुपच्या गुरुग्रामस्थित एसआरएस पर्ल, एसआरएस सिटी, एसआरएस प्राइम या प्रकल्पांच्या ७८ घर खरेदीदारांना अटक केली आहे, ज्यांच्या किंमती २० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. या प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे. गेल्या आठवड्यात ईडीने दिल्ली, हरयाणा, पंजाब, महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तराखंडमधील ४४ जागांची झाडाझडती घेतली.

टॅग्स :धोकेबाजीशेअर बाजारगुन्हेगारी