Join us

गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ कंपनीचा १,५५० कोटींचा IPO घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 4:43 PM

गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी उत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे‘या’ कंपनीचा १,५५० कोटींचा IPO घोषितसिमेंट उद्योग वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली: आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये चढ-उतार असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच नवीन आर्थिक वर्षात अनेकविध कंपन्या आपले आयपीओ शेअर बाजारात सादर करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी उत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण भारतातील सिमेंट उद्योगात आघाडीवर असलेल्या पेन्ना सिमेंट कंपनीकडून कोट्यवधी रुपयांच्या आयपीओची घोषणा करण्यात आली आहे. (penna cement ipo soon files with sebi for 1550 crore rupees)

सिमेंट उद्योगात चांगली पकड असलेला ब्रँड म्हणून पेन्ना सिमेंट कंपनीची ओळख आहे. भारतातील दक्षिण तसेच पश्चिमेकडील राज्यांमध्ये या ब्रँडचे बळकट अस्तित्व आहे. कंपनीची स्थापना १९९१ दरम्यान करण्यात आली तर कामकाजाची सुरुवात १९९४ मध्ये झाली. ही भारतामधील सर्वात मोठी खासगी मालकीची सिमेंट कंपनी आहे. तिची कामकाज आंध्र प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रात असलेल्या ४ आयएसओ प्रमाणित एकीकृत निर्मिती सुविधाकेंद्रे आणि दोन ग्राईंडिंग युनिटमधून चालते.

१,५५० कोटींचा IPO घोषित

पेन्ना सिमेंट कंपनीने इक्विटी शेअरच्या विक्रीतून १,३०० कोटींचा निधी उभारण्याचे ठरवले असून, प्रवर्तक विक्रेते समभागधारकांकडून २५० कोटींचे समभाग विक्री असा एकूण १,५५० कोटींच्या आयपीओची घोषणा केली आहे. या निधीतून उभ्या राहणाऱ्या रकमेचा विनियोग ५५० कोटींची कंपनीची काही देणी चुकती करण्यासाठी होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

गुड न्यूज! आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग? पाहा

सिमेंट उद्योग वाढण्याची शक्यता

पेन्ना कंपनी भारतातील एक सर्वात मोठे बंदर-आधारीत टर्मिनल कृष्णापट्टणम येथे कार्यान्वित आहे. भारतात पायाभूत गुंतवणूक, घरांची पुन्हा वाढलेली मागणी तसेच विविध सरकारी योजनांमुळे देशातील सिमेंट उद्योग वित्तीय वर्ष २०२१ आणि वित्तीय वर्ष २०२६ दरम्यान ६ ते ७ टक्के वार्षिक दराने वाढण्याची शक्यता आहे, असे सांगितले जाते.  

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगव्यवसाय