Join us

पेन्शनसाठी नो टेन्शन, तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसकडून मिळवा Life Certificate, सुरू राहील पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 7:01 PM

post office : इंडिया पोस्टच्या या प्रस्तावामुळे केंद्र सरकारचे सुमारे 60 लाख निवृत्तीवेतनधारक आणि विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी एजन्सीच्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

नवी दिल्ली : सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार निवृत्तीवेतनधारकांसाठी इंडिया पोस्टाकडून (India Post) एक चांगली बातमी आहे. आता पेन्शनधारक आणि इतर सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) मिळू शकते, असे इंडिया पोस्टाने म्हटले आहे. 

तंत्रज्ञानाची माहिती नाही आणि जीवन प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांना आपल्या बँकेत जावे लागले, अशा पेन्शनधारक आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. दरम्यान, काही वेळा निवृत्तीवेतनधारकाला त्यांचे जीवन प्रमाणपत्र दाखला मिळविण्यासाठी त्यांच्या मालकाकडे जावे लागते. इंडिया पोस्टच्या या प्रस्तावामुळे केंद्र सरकारचे सुमारे 60 लाख निवृत्तीवेतनधारक आणि विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी एजन्सीच्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

इंडिया पोस्टाकडून ट्विटइंडिया पोस्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या उपक्रमाची घोषणा केली. यामध्ये म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक आता जवळच्या पोस्ट ऑफिसच्या सीएससी काऊंटरवर सहजपणे जीवन प्रमाणपत्र मिळवण्याची सेवा घेऊ शकतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याद्वारे हे प्रमाणित केले गेले की, पेन्शनधारक जिवंत आहे आणि हे प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन थांबविली जाऊ शकते.

आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून मिळवा जीवन प्रमाणपत्रइंडिया पोस्टच्या घोषणेनंतर पेन्शनभोगी पेन्शन वितरण एजन्सीऐवजी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्याने सेवा बजावली आहे, त्या प्राधिकरणाकडे जाऊ शकते. भविष्यात पेन्शन मिळविणे सुरू ठेवण्यासाठी त्याचा जीवन प्रमाणपत्र मिळवू शकेल. ज्या निवृत्तीवेतनधारकांना पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीकडे जाण्यास अडचण येते, ते डिजिटल जीवन प्रमाण पत्रघेण्यासाठी जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्राला भेट देऊ शकतात.

टॅग्स :निवृत्ती वेतनपोस्ट ऑफिस