पेन्शनर्सकडून अर्थसंकल्पपूर्व अपेक्षा .....२ ...
By admin | Published: June 26, 2014 11:00 PM2014-06-26T23:00:53+5:302014-06-26T23:00:53+5:30
>कृषीमध्ये युवकांसाठी योजना राबवाभारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. या क्षेत्राकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. युवकांना कृषीकडे वळविण्यासाठी शेतकी मालाला जास्त भाव मिळावा आणि विशेष प्रोत्साहनपर योजनांची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करावी.सुभाष चंद्रायण, सेवानिवृत्त अधीक्षक, कृषी कॉलेज.नि:शुल्क औषधे मिळावीधावपळीत जीवन जगताना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे खर्चही वाढतो. शिवाय अनेक उपचार पद्धती आणि तपासण्या तसेच महागडी औषधे खरेदी करणे पेन्शनर्सला शक्य नसते. नवीन सरकारने सवलतीत उपचार आणि नि:शुल्क औषधे देण्याची घोषणा करावी.वसंत झाडे, सेवानिवृत्त सहायक अभियंते, एमएसईबी.ठेवीवर करकपात करासेवानिवृत्तीनंतर मिळालेला पैसा हा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात असतो. ठेवीपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकराची आकारणी करण्यात येते. यावर्षी अर्थसंकल्पात कर आकारणी हटवावी आणि आयकर मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवावी.अशोक भेंडे, सेवानिवृत्त, पोस्ट ऑफिस.अन्न सुरक्षा कायद्यात समावेश करावाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या अल्पशा पेन्शनमध्ये घर चालविणे कठीण आहे. गरीबांना मिळणाऱ्या अन्न सुरक्षा कायद्याचा फायदा पेन्शनर्सला मिळावा. तशी घोषणा सरकारने करावी. आधार कार्डाच्या आधारे नवीन रेशन कार्ड मिळावे.प्रभाकर काळे, सेवानिवृत्त, ऑर्डनन्स फॅक्टरी.युवकांना रोजगार द्यायुवकांना रोजगार देणाऱ्या योजनांची घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात करावी. मुलांना नोकरी मिळाल्यास पेन्सनर्सला दिलासा मिळतो. रेल्वेत प्रवासी शुल्कात ५० टक्के सूट आणि एसटीत मोफत प्रवास, जीवनावश्यक वस्तूंचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष योजनांची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित आहे.प्रकाश महाले, सेवानिवृत्त, टेलिकॉम विभाग.