Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेन्शनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो हयातीचा दाखला, ऑनलाइन कसा सादर करायचा जाणून घ्या...

पेन्शनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो हयातीचा दाखला, ऑनलाइन कसा सादर करायचा जाणून घ्या...

नवी दिल्ली- पेन्शनधारकांना अधिकाअधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे. पेन्शन धारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:05 PM2021-11-11T14:05:06+5:302021-11-11T14:05:35+5:30

नवी दिल्ली- पेन्शनधारकांना अधिकाअधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे. पेन्शन धारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन ...

Pensioners Here is how you can generate and submit life certificate online | पेन्शनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो हयातीचा दाखला, ऑनलाइन कसा सादर करायचा जाणून घ्या...

पेन्शनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो हयातीचा दाखला, ऑनलाइन कसा सादर करायचा जाणून घ्या...

नवी दिल्ली-

पेन्शनधारकांना अधिकाअधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे. पेन्शन धारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन हयातीचा दाखला म्हणजेच लाइफ सर्टिफिकेट सादर करावं लागतं. हयातीचा दाखल बँकेत सादर न केल्यास देखील थांबवली जाऊ शकते. पण आता पेन्शनधारकांना हयातीचा दाखल सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या हयातीचा दाखला सादर करता येऊ शकतो. पेन्शनधारकांसाठी आधारशी संलग्न डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate-DLC) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

पेन्शन धारकाचा आधार क्रमांक आणि बायोमॅट्रीकच्या मदतीनं हयातीचा दाखल ऑनलाइन पद्धतीनं सबमिट करता येतो. पेन्शनधारकाला आता बँकेच्या अधिकाऱ्यासमोर उभं राहण्याची आणि बँकेच्या रांगेत ताटकाळत राहण्याची गरज नाही. त्यासाठी नेमकं काय करावं लागतं ते जाणून घेऊयात. 

प्रत्येक जीवन प्रमाणचा (DLC) यूनिक आयडी असतो ज्यास प्रमाण-आयडी (Pramaan-ID) संबोधलं जातं. हयातीचा दाखला सादर करण्याआधी पेन्शनधारक जीवंत आहे हे सुनिश्चित करावं लागतं. पेन्शनधारक हयात असून त्याला मिळणारा लाभ यापुढेही सुरु राहावा यासाठी हयातीचा दाखला मिळवणं गरजेचं असतं. 

ऑनलाइन पद्धतीनं हयातीचा दाखला कसा मिळवाल?
- केंद्र सरकारचं Jeevan Pramaan अ‍ॅप डाऊनलोड करा आणि register as new user पर्यायावर क्लिक करा. 
- पेन्शन धारकाचा आधार क्रमांक, नाव, बँक खात्याचा क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि इतर माहिती भरा. यात तुम्हाला OTP पाठवण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. 
- तुमच्या रजिस्टर मोबाइळ क्रमांकावर OTP येईल तो सहा अंकी ओटीपी भरा
- व्हॅलीडेशननंतर सबमिटच्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक प्रमाण आयडी जनरेट होईल. 

ऑनलाइन हयातीचा दाखला कसा जनरेट कराल?
- प्रमाण आयडी जनरेट झाल्यानंतर दुसऱ्या ओटीपीच्या सहाय्यानं अ‍ॅपमध्ये पुन्हा लॉगइन करा
- जनरेट जीवन प्रमाण पर्यायावर क्लिक करा आणि आधार व मोबाइल क्रमांक नमूद करा. 
- जनरेट ओटीपी पर्यायावर क्लिक करा आणि तो नमूद केल्यानंतर पीपीओ क्रमांक, वितरण एजन्सीचं नाव, तुमचं नाव आणि इतर माहिती नमूद करा
- आधार डेटाची माहितीचा वापर करुन पेन्शनधारकाचं फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन करुन प्रमाणित करा. 
- हयातीचा दाखला उपलब्ध होईल आणि पेन्शनधारकाच्या रजिस्टर मोबाइलवर SMS च्या माध्यमातून कन्फरमेशन मेसेज देखील येईल. 

Web Title: Pensioners Here is how you can generate and submit life certificate online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.