देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात (Real Estate Sector) सातत्याने तेजी दिसत आहे. निफ्टी रिअल्टी इंडेक्सने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 40 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली असून 52-आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. इंडेक्सने 2023 मध्ये आतापर्यंत 33 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ही तेजी रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेयर्समध्ये आलेल्या मजबूतीमुळे आली आहे. या कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये घरांची विक्रमी विक्री बुकिंग नोंदवली आहे.
शेअर्समध्ये 6 महिन्यांत जबरदस्त तेजी - गेल्या सहा महिन्यांच्या काळात मायक्रोटेक डेव्हलपर्सच्या शेअरमध्ये 55 टक्क्यांची तेजी आली आहे. प्रेस्टीज इस्टेट्स प्रोजेक्ट्स (Prestige Estates Projects) मध्ये 58 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. डीएलएफचा शेअर 43 टक्क्यांनी वधारला आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांची तेजी आहे. याच बरोबर द फिनिक्स मिल्सचा शेअरदेखील 36 टक्क्यांनी वधारला आहे.
या शेअर्समध्येही तेजी - याशिवाय, ब्रिगेड एंटरप्रायजेस, इंडियाबुल्स रिअल इस्टेट, ओबेरॉय रिअल इस्टेट आणि सनटेक रियल्टीचे शेअर गेल्या सहा महिन्यांत 25 ते 35 टक्क्यांच्या वृद्धीसह व्यवहार करत आहेत. भारतातील टॉप-8 शहरांमधील एकूण रेसिडेन्शिअल मार्केटचा विचार करता, आर्थिक वर्ष 2023 मध्ये इंडस्ट्रीचे विक्री बुकिंग मूल्य 36 टक्क्यांनी वाढून (YoY) 29,000 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)