Join us  

स्मार्टफाेन ऑनलाइन नकाे, दुकानातूनच हवा! 5G सेवांनंतर प्रीमिअम मोबाइलच्या मागणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 7:54 AM

सरकारचा महसूलही ३६ टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली : स्मार्टफाेन्स तसेच इतर ॲक्सेसरीजची ऑनलाइन विक्री माेठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, ऑफलाइन विक्रीने ऑनलाइनवर मात केली असून त्यातून सरकारला मिळणारा महसूलदेखील जास्त आहे. एका अहवालानुसार २०२२ मध्ये त्यात ३६ टक्के वाढ झाली आहे.

५जी सेवा सुरू झाल्यानंतर प्रमिअम स्मार्टफाेनची मागणीत वाढली आहे. त्या विक्रीतून हाेणाऱ्या महसुलात १७ टक्के वाढ झाली आहे. हा आकडा १७ हजार काेटी रुपये एवढा आहे. यासाेबतच ५जी सक्षम आणि माेठा डिस्प्ले असलेल्या स्मार्टफाेनची मागणीही १५% वाढली आहे.  अत्याधुनिक स्मार्टफाेन्ससह वेअरेबल्सच्या विक्रीतून मिळणारा महसूल तब्बल १२७ टक्क्यांनी वाढला आहे, तर स्मार्टवाचमधून ९३ टक्के महसूल वाढला आहे. 

छाेट्या शहरांमध्ये विक्री वाढलीटियर-१ शहरांमध्ये स्मार्टफाेन्स आणि वेअरेबल्सची सर्वाधिक विक्री झाली आहे. लाेकांच्या बदलणाऱ्या गरजा आणि राहणीमानामुळे टियर-३ आणि लहान शहरांमध्ये मागणी वाढली आहे. या भागात आराेग्याशी संबंधित ट्रॅकिंग सेंसर असलेल्या गॅजेट्समध्ये यानंतर मागणीत वाढ झालेली दिसून येईल.

टॅग्स :स्मार्टफोनव्यवसायसरकार