Lokmat Money > बिझनेस न्यूज > 1 गुडन्यूज अन् अदानी पॉवरचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; या 6 कंपन्यांचे झाले मर्जर

1 गुडन्यूज अन् अदानी पॉवरचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; या 6 कंपन्यांचे झाले मर्जर

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरमध्ये 6 कंपन्यांचे मर्जर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:41 PM2023-03-09T14:41:33+5:302023-03-09T14:42:07+5:30

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरमध्ये 6 कंपन्यांचे मर्जर झाले आहे.

people rush to buy Adani Power shares These 6 companies were merged | 1 गुडन्यूज अन् अदानी पॉवरचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; या 6 कंपन्यांचे झाले मर्जर

1 गुडन्यूज अन् अदानी पॉवरचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; या 6 कंपन्यांचे झाले मर्जर

शेअर बाजारात अदानी पॉवरच्या (Adani Power) शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आज पुन्हा एकदा अपर सर्किट लगले. यामुळे अदानी पॉवरच्या एका शेअरची किंमत 196.05 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी कंपनीसंदर्भात मंगळवारी एक आनंदाची बातमी आली होती.

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरमध्ये 6 कंपन्यांचे मर्जर झाले आहे. यांत अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड, अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड, उड्डपी पॉवर कॉरपोरेशन लिमिटेड, रायपूर एनर्जी लिमिटेड, रायगढ एनर्जी जनरेशन लिमिटेड आणि अदानी पॉवर (मुंद्रा) लिमिटेडचा समावेश आहे. या सर्व, समूहाच्या सब्सिडरी कंपन्या आहेत.

27 फेब्रुवारीपासून लागतेय अपर सर्किट - 
कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर असण्याचा शेअर बाजारातील आजचा 7 वा दिवस आहे. 27 फेब्रुवारीपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. गेल्या महिनाभरातील अनेक चढ-उतारांदरम्यान कंपनीच्या शेअरचा भाव 12.82 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र अशा पद्धतीची तेजी असूनही 6 महिन्यांपूर्वी अदानी पॉवरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिकचे नुकसान सोसावे लागत आहे. शेअर बाजारात अदानी पॉवरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 432.50 रुपये प्रति शेअर तर निचांक  119.60 रुपये प्रति शेअर आहे.


 

Web Title: people rush to buy Adani Power shares These 6 companies were merged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.